आदित्य ठाकरे म्हणाले, काल इथं कुणी तरी गाजर दाखवून गेलं, आता फडणवीसांचं थेट उत्तर

| Updated on: Oct 27, 2021 | 4:48 PM

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीची आदित्य यांची ही प्रचारसभा आणखी एका कारणामुळे विशेष ठरली. याआधी 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची एकमेव सभा होती. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू असलेल्या आदित्य यांनी दादरा नगर-हवेलीमध्ये प्रचारसभा घेतली.

आदित्य ठाकरे म्हणाले, काल इथं कुणी तरी गाजर दाखवून गेलं, आता फडणवीसांचं थेट उत्तर
Devendra Fadanvis
Follow us on

दादरा नगर-हवेली: शिवसेना आणि भाजप यांच्यात दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्यालाच आता देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आदित्यच्या टीकेवर बोलत नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या विषयावर बोलण्याचं टाळलंय.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला होता. आम्ही इथे पक्ष वाढवण्यासाठी आलो नाही, आम्ही गोव्यात गेलो, राजस्थानमध्ये गेलो, परंतु ही लढाई न्याय हक्कासाठी आहे. डेलकर कुटुंब असेल, दादरा, नगर-हवेली असेल यांच्यासाठी आहे. दोन परिवार एकत्र आल्यानंतर जो उत्साह आहे तो मी पाहिला आहे. डेलकर कुटुंबाचे मी इथे काम पाहिले, योगदान पाहिले. आजचा जनतेचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा ‘सीमोल्लंघन’

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीची आदित्य यांची ही प्रचारसभा आणखी एका कारणामुळे विशेष ठरली. याआधी 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची एकमेव सभा होती. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू असलेल्या आदित्य यांनी दादरा नगर-हवेलीमध्ये प्रचारसभा घेतली.

फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सिल्वासात प्रचारासाठी आले होते. यावेळी शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

संबंधित बातम्या

फक्त झोपा, नेटफ्लिक्स पाहा आणि 25 लाख मिळवा, ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

EPFO Alert: …तर पीएफमध्ये आलेले व्याजाचे पैसे गायब होणार, चुकूनही हा नंबर शेअर करू नका

devendra fadnavis criticism on aditya thackeray Due to byelection of Dadra Nagar-Haveli Lok Sabha constituency