AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्षावर निकाल, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्षावर निकाल, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय ?
Image Credit source: tv9
| Updated on: May 11, 2023 | 2:06 PM
Share

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे. त्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेणार आहोत, त्यामध्ये निकालावर अधिक विश्लेषण करू. मात्र सध्या मला एवढंच सांगायचं आहे की, जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बाकीचे विश्लेषण पत्रकार परिषदेत करू, असेही ते म्हणाले.

न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, आमची बाजू सत्याची – शंभुराज देसाई

सत्तासंघर्षाच्या निकाला नंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने दिलेला निर्णयाचं स्वागत आम्ही करत असुन हा विजय सत्याचा असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं. आम्ही जनतेत जाऊन काम करत आहोत, जनतेच्या सोबत आहोत हे यातुन अधोरेखीत झाल्याचं शंभुराज देसाई यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे आणि विरोधक सांगत होते आमदार आणि मुख्यमंत्री अपात्र होणार आणि सरकार ढासळणार मात्र आम्हाला कोर्टाच्या निकालावर विश्वास होता. संजय राऊत यांच्या बोलण्याकडं आम्ही लक्ष देत नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला यामुळं त्यांच सरकार गेलं हे सुप्रीम कोर्टाचं निरिक्षण आहे .

संजय राऊतांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावे – शहाजीबापू पाटील

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आमदार शहाजीबापू पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार मानतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घश्यात जाण्यापासून वाचवल्याचेही त्यांनी नमूद केले.

संजय राऊतांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावे आणि नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?