AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच फडणवीस थेट दिल्लीमध्ये, नेमकं काय घडतंय? मुख्यमंत्र्यांचं राजधानीमधून पहिलं ट्विट

मोठी बातमी समोर येत आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले, त्यामुळे चर्चेला उधाण आलं असतानाच आता त्यांचं पहिलं ट्विट समोर आलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच फडणवीस थेट दिल्लीमध्ये, नेमकं काय घडतंय? मुख्यमंत्र्यांचं राजधानीमधून पहिलं ट्विट
Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 7:11 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यानंतर आता त्यांचं पहिलं ट्विट समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्रात फडणवीस यांना शिक्षण खांत मिळू शकतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता फडणवीस यांनी पहिलं ट्विट केलं आहे.

फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं? 

धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या,  राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. परदेशात आयआयटीचा विस्तार, 19 भाषांमध्ये प्रवेश परीक्षेचा विस्तार यांसह त्यांनी अनेक सुधारणा शिक्षण क्षेत्रामध्ये घडवून आणल्या. व्यापक सामाजिक हितासाठीची आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला, संपूर्ण भाजप परिवार त्यांच्यासोबत आहे, असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

तीनही मागण्या मान्य 

दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या, त्यातील पहिली आणि प्रमुख मागणी होती ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरी मागणी म्हणजे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, आणि तीसरी मागणी ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्ष प्रकरणात आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबाला मदत, दरम्यान या तीनही मागण्या मान्य झाल्या असल्याची माहिती कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?