‘गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी…’, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील सर्वच पाकिस्तान नागरिक सापडले आहे.

गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी..., देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
| Updated on: Apr 27, 2025 | 11:00 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत रविवारी महत्वाचे वक्तव्य केले. तसेच माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या देताना खबरदारी घेण्याचे सांगितले. पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

सर्वच फ्लेक्स काढा

राज्यातील शहराशहरांमध्ये करण्यात येत असलेली फ्लेक्सबाजी बंद करायला हवी. फ्लेक्सबाजीवर टाच आणायला हवी. कारण त्यामुळे शहरांचे सौदर्यं खराब होत आहे. कोणाला फ्लेक्स लावायचे असेल तर त्यांनी ते अधिकृत होर्डिंगवर फ्लेक्स लावा. माझे स्वत:चे अनधिकृत फ्लेक्स काढा, असे मी महानगरापालिकांना सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

एप्रिल- मे महिन्यांत जलसाठे कमीच…

राज्यातील पाणी टंचाई भीषण होत आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एप्रिल मे महिन्यांत पाणीसाठा कमी असतो. ही परिस्थिती पहिल्यांदा आलेली नाही. दरवर्षी अशी परिस्थिती असते. मागील वर्षीही एप्रिल-मे महिन्यांत ३२ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी तो ३८ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा चांगली परिस्थिती आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये पाणी साठा चांगला आहे. परंतु लहान धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे.

पुणे महापालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याबद्दल पुणे अर्बन डायलॉग हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जे काही आव्हाने आहेत, त्यावर या माध्यमातून चर्चा होणार आहे. हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मनपाच्या उपक्रमाचे कौतूक केले.