AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट, शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल

पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आ. संजय गायकवाड गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट, शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल
संजय गायकवाड
| Updated on: Apr 27, 2025 | 9:19 AM
Share

महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असे आक्षेपार्ह विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यानंतर संजय गायकवाड सर्व बाजूंनी अडचणीत आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आ. संजय गायकवाड गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय गायकवाड म्हणाले, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.

एकनाथ शिंदे पण आमचेच आहे. तसेच देवेन्द्रजी आमचे नेते आहे. ते मला याबद्दल बोलले असते तरी काही अडचण नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी माझे शब्द मागे घेतो. या वक्तव्यावर आपण विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करत आहे, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गायकवाड यांच्या वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी प्रतिमा आहे. देशात महाराष्ट्र पोलिसांनी उत्कृष्ट काम करून दाखवले. संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पद्धतीचे वक्तव्य वारंवार चालणार नाही. मी शिंदे साहेबांकडे तक्रार केली. त्यांना कडक समज द्या, अशी मागणी केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....