हापूस आंब्यातील फसवणूक टळणार, देवगड हापूसवर येणार बारकोड, मग असा ओळखा अस्सल आंबा

Devgad Hapus : व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टममधील UID शी जुळला, तर ग्राहकास शेतकरी/विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, GI नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जाईल. या पडताळणी प्रक्रियेमुळे देवगड हापूस बाबतची विश्वसनीयता वाढेल यासाठी UID करण्यात आला आहे.

हापूस आंब्यातील फसवणूक टळणार, देवगड हापूसवर येणार बारकोड, मग असा ओळखा अस्सल आंबा
Devgad Hapus
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 11:41 AM

Devgad Hapus :फेब्रुवारी महिना सुरु झाल्यावर खवय्यांना हापूस आंब्याचा वेध लागतात. कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूसची चव जगभरातील खवय्यांच्या पसंतीला पडलेली आहे. यामुळे बऱ्याच वेळा हापूस आंब्याच्या नावाने वेगळचा कोणता आंबा ग्राहकांचा माथी मारला जातो. सर्वसामान्यांना हापूस आंबा ओळखता येत नाही. त्यामुळे आता देवगड हापूस ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. देवगड हापूस आंब्यावर आता बाराकोड असणार आहे.

खरा देवगड हापूस कसा ओळखायचा?

देवगड हापूस म्हणून अनेकांची फसवणूक होते मात्र ही फसवणूक रोखण्यासाठी आता टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या टेक्नोलॉजीमुळे नागरिकांना खरा देवगड हापूस ओळखणे सोप होणार आहे. यासाठी प्रत्येक पॅकअपवर TP seal UID कोड लावण्यात आला आहे. त्या माध्यमातून खरा देवगड ओळखत येणार आहे. जीआय नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होणार आहे.

TP Seal UID स्टिकर technology कशी काम करते?

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने GI नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID वितरित केले आहेत. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल. प्रत्येक स्टीकर दोन भागात विभागलेला एक स्वतंत्र युआयडी असतो. त्या कोडचा एक भाग स्टीकरच्या वरती आणि दुसरा भाग स्टीकरच्या खाली असतो.

व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवा

आपल्याकडील आंबा देवगड हापूसच आहे का? हे तपासण्यासाठी ग्राहकांनी +91 9167 668899 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फोटो पाठवायचा आहे. ही सिस्टम (प्रणाली) त्या स्टीकर वरील कोड वाचते आणि स्टीकरच्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते. नंबर वाचण्यासाठी स्टीकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात.

जर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टममधील UID शी जुळला, तर ग्राहकास शेतकरी/विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, GI नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जाईल. या पडताळणी प्रक्रियेमुळे देवगड हापूस बाबतची विश्वसनीयता वाढेल यासाठी UID करण्यात आला आहे.