अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिलासा, परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

| Updated on: Jun 23, 2021 | 6:28 PM

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिलासा, परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Follow us on

मुंबई : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 30 जूनपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यापूर्वी 18 जूनपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. (Dhananjay Munde announce Decision for SC Students)

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त झालं नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी धनंडय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनच्या आत अर्ज दाखल करावे

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाला निर्देश दिले. त्यानुसार ही मुदत 30 जून पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. मुंडे यांच्या आदेशानंतर आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनच्या आत आपले अर्ज दाखल करून घ्यावेत, असं आवाहन समाज कल्याण आयुक्तालयाकडून करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी मिळणार मोठी मदत

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात मार्चमध्ये धनंजय मुंडे यांनी अंशतः बदल केले होते. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेचा कोटा 2003-04 नंतर प्रथमच 100% पूर्ण झाला आहे. अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव शिष्यवृत्तीचा लाभ नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे संधी देण्यात येईल असा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा

दरवर्षी 75 विद्यार्याथ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. 2020-2021 या शैक्षणिक वर्षात परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी निवड समितीने अंतिम निवड केलेल्या 75 पैकी 9 विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा लाभ नाकारल्याने 9 जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र धनंजय मुंडे यांनी केलेल्या नव्या निर्णयामुळे या ९ जागी प्रतीक्षा यादीतील 9 विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, यामुळे सन 20003 -04 नंतर प्रथमच या योजनेतील लाभार्थींचा कोटा 100% पूर्ण झाला आहे.

इतर बातम्या :

आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला यश, अखेर 1 जुलैपासून पगारात वाढ, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून 24 तासात डॅमेज कंट्रोल, टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम, आव्हाड म्हणाले आनंद आहे!

Dhananjay Munde announce Decision for SC Students