माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा… प्रकरण सीबीआयकडे द्या… धनंजय मुंडे म्हणाले, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही…

मराठा नेते मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यावर मुंडेंनी आक्रमक भूमिका घेत आरोप फेटाळले. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा... प्रकरण सीबीआयकडे द्या... धनंजय मुंडे म्हणाले, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही...
| Updated on: Nov 07, 2025 | 4:14 PM

राज्याचे नेते धनंजय मुंडे आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. आता धनजंय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी थेट कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सत्यता बाहेर काढण्यासाठी सीबीआय (CBI) चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंनी केलेल्या विविध आरोपांवर उत्तर दिले. यावेळई त्यांनी थेट राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. धनंजय मुंडेंना संपवून टाकेन म्हणतात. मला संपवून टाकेल असं ऑन एअर म्हणत असतील तर काय कारवाई होईल. सरकार काय करणार आता. कायदा नाही का? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.

या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेली पाहिजे

माझं जीवन आणि मरण हे गरीबातीली गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आहे. त्यांच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतो काही करू नका. काही करू नका असं वारंवार सांगतात. काही करण्यासाठी हा आदेश होता का. हे आता अति झालं. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची. ओळख करून घ्यायची. फोटो काढायचा. फोन करायचा. आम्ही आमच्या कामात, असे धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी धनंजय मुंडे यांनी आरोपांमागील सत्यता आणि षडयंत्र उघड करण्यासाठी कठोर तपासणीची मागणी केली आहे. जे व्हायचं ते होऊ द्या. ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय चौकशी करा. काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेली पाहिजे. सीएमला विनंती आहे. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

सर्व गोष्टी जरांगेंना महागात पडणार

माझं फोनवर बोलणं झालं. चोवीस तास सुरू असतो. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्या गरीबांना अडचण आली तर ते माझा फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी फोन सुरू ठेवतो. त्यात मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो का. त्यांना संपवण्यासाठी बोललो का. या सर्व गोष्टी जरांगे जी महागात पडणार आहे. कर्मा रिपीट. तुम्ही जेवढं खोटं कराल. तेवढं ते मागे फिरेल, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले.