मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, ते प्रकरण भोवणार? गुन्हा दाखल करण्याची मागणी

धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत, आता पुन्हा एकदा ते एका प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, ते प्रकरण भोवणार? गुन्हा दाखल करण्याची मागणी
dhananjay munde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 4:17 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटला आहे. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली, त्यांनी मराठा भवनसाठी श्री दत्त देवस्थान थोरले देवघर यांच्या जमिनिचा बेकायदेशीरपणे ताबा दिला, असा आरोप  श्री दत्त देवस्थान थोरले देवघरचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी केला आहे. दरम्यान आता हा वाद चांगलाच पेटला असून, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

परळीमध्ये 14 मे रोजी आमदार धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन करत मराठाभवन साठी 28 गुंठे जमीन दिली होती. मात्र या जमिनीवरून आता मोठा वाद पेटला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे सर्व कागदपत्रे आणि निवेदन देऊन सदरील जमीन आपल्या मालकीची असून तिचा बेकायदेशीर ताबा देण्यात आला, या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आता संस्थाच्या वतीनं करण्यात आली आहे.

श्री दत्त देवस्थान संस्थानच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा ‘मराठा भवन’साठी दिल्याप्रकरणी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अन्य संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी संस्थानने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. वर्ग-2 ची ही इनामी जमीन आहे, असं असतानाही  संगनमताने बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान कारवाई न झाल्यास हायकोर्ट जाण्याचा आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा देखील यावेळी संस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us