AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! …तर हे घडलंच नसतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, यावर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यावरून त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मोठी बातमी! ...तर हे घडलंच नसतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
chhagan bhujbalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 26, 2026 | 4:00 PM
Share

नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जतंर मंतर मैदानावर तब्बल एक महिना आंदोलन केलं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले, दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.

या घटनेमुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं. या आंदोलनाला विरोधी पक्षाचा देखील पाठिंबा मिळाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. या सर्व पार्श्वभूमीवर दबाव वाढल्याने अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

जे घडलं ते सर्व तुमच्यासमोर घडलं आहे. परंतु जर धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच राजीनामा दिला असता तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. पोलिसांचा लाठीचार्ज, त्यानंतर देशात पसरलेली संतापाची लाट या सर्व गोष्टी संपूर्ण जगाने पाहिल्या आहेत.  जर त्यांनी आधी राजीनामा दिला असता तर हे घडलं नसतं. धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिला आहे, परंतु तो त्यांनी 15 दिवसांपूर्वीच द्यायला पाहिजे होता. सरकारमधील ज्येष्ठ लोकांना यावर त्यांच्याशी आधीच चर्चा करायला पाहिजे होती.

सोनम वांगचूक यांना देखील 26 दिवस उपोषण करावा लागलं. ज्या घटना या काळात घडत होत्या त्यामुळे लोकांच्या मनात तीव्र संतापाची लाट पहायला मिळाली. आता हा संताप शांत करण्याचं काम झालं पाहिजे, सर्वांशी संवाद साधण गरजेचं आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा