जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, धुळे-नंदुरबार, साताऱ्यात 10 जागांसाठी आज मतदान

| Updated on: Nov 21, 2021 | 10:48 AM

धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि सातारा (Satara) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Jilha Bank Election) आज मतदान होत आहे. धुळ्यात 17 जागांपैकी सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असल्याने आता एका गटातील दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 20 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, धुळे-नंदुरबार, साताऱ्यात 10 जागांसाठी आज मतदान
प्रातिनिधिक
Follow us on

धुळे : धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि सातारा (Satara) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Jilha Bank Election) आज मतदान होत आहे. धुळ्यात 17 जागांपैकी सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असल्याने आता एका गटातील दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 20 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

धुळे आणि नंदुरबार असे दोन्ही जिल्हे मिळून एकूण 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात दहा मतदान केंद्र धुळे जिल्ह्यात जिल्हा बँकेसाठी रविवारी सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत अखंड मतदान होणार असून यासाठी एकूण 938 मतदार आहेत. सर्वसाधारण गटातील मतदारांना केवळ सर्वसाधारण गटातून मतदान करता येईल. तर राखीव गटासाठी सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. या बँकेत शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर भारतीय जनता पक्षाचे अमरीश भाई पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदान झाल्यानंतर सोमवारी (22 नोव्हेंबर) मतमोजणी होणार असून निकाल आज जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अंकुश पाटील ,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माधवराव धनगर, हर्षवर्धन दहिते, सुरेश रामराव पाटील माजी आमदार शरद पाटील, यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार आहेत याशिवाय इतर गटात देखिले लडकी आमनेसामने असल्याने लढती चुरशीच्या होण्याचे संकेत आहेत. या लढतीकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या लक्षवेधी लढतीमध्ये कोण बाजी मारणार आणि फैसला हा सोमवारी होईल.

साताऱ्यात 10 जागांसाठी मतदान

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. सातारा जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात प्रतिष्ठित बँक म्हणून या बँकेकडे बघितलं जातं या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मातब्बर आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कराड सोसायटी मतदारसंघात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध काँग्रेस नेते उदयसिंह पाटील अशी लढत होत आहे. त्यामुळे कराडमध्ये चुरस पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात भाजप काँग्रेसचं OBC कार्ड, विधानपरिषदेला बावनकुळेंविरोधात ओबीसी उमेदवार?

Maharashtra Vidhan Parishad | विधानपरिषद निवडणुकीत भाजपची भिस्त आयारामांवर, पाचपैकी तिघे उमेदवार मूळ काँग्रेसचे