“शेतीप्रधान देशात, शेतकऱ्यांचेच प्रचंड हाल”; शेतकरी विरोधी असलेल्या धोरणावर राष्ट्रवादीची टीका…
सरकारच्या या धोरणामुळे देशातील श्रीमंत लोकं अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब लोकं अधिक गरीब होत असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

धुळे : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने त्यांनी आम्ही शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असल्याचे अश्वासन दिले आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरघोस मदत मिळाली नाही. त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी मागणी करून सरकारकडून तात्काळ मदत दिली गेली नाही. सरकारच्या याच प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.
आमदार छगन भुजबळ यांच्याकडून सरकारवर टीका करताना, आपला देश कृषीप्रधान देश आहे मात्र याच कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.
सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
सध्याच्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. छगन भुजबळ यांनी सांगितले की, सरकार आर्थिक मदत देणार, शेतकऱ्यांचा विकास करणार असं फक्त अश्वासन देत आहे मात्र प्रत्यक्षात मात्र मदत देताना सरकार टाळाटाळ करत आहे असा गंभीर आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.
सहकार क्षेत्रावरही वाईट काळ
सरकार शेतकऱ्यांना एकरी 13 हजार मदत करणार अस सांगते आहे. परंतु शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला आहे. तर सहकार क्षेत्रात देखील सरकारमुळे वाईट परिस्तिथी निर्माण झाली आहे. कृषी आणि सहकार क्षेत्राबाबत सरकारचे धोरण उदासीन असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
युवकांना रोजगार नाही
आमदार छगन भुजबळ यांनी आज बोलताना ज्या प्रमाणे त्यांनी राज्य सरकारवर टीका केली, त्याच प्रमाणे त्यांनी केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला आहे. आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणाले दरवर्षी 2 हजार लोकांना रोजगार मिळवून देणार पण अजून कोणत्याही युवकाला रोजगार मिळाला नाही तरी, केंद्र सरकार अश्वासनं देण्यापलिकडे काहीही करत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
गरीब लोकं अधिक गरीब
सरकारच्या या धोरणामुळे देशातील श्रीमंत लोकं अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब लोकं अधिक गरीब होत असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे समाजा समाजामध्ये दुही कशी माजवली जाईल याकडे मात्र सरकार बारकाव्याने लक्ष देते आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
