Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील यांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की..
Dilip Walse Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी राजकारणात मंत्रीपदासह विविध पदं भूषवली आहेत.

राज्यात कांदा प्रश्न चिघळला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. काद्यांच्या या मुद्यावर रोहित पवार आंदोलन करत आहेत. त्यांनी हा विषय लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. “आंदोलन करणारे जे आहेत, त्यांना माझी एवढीच विनंती आहे की, सरकारतर्फे ज्या उपायोजना केल्या जात आहेत, जी पावलं टाकली जात आहेत. त्यात आणखी सुधारणा करायच्या असतील तर माझी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.”आंदोलन संपल्यावर ते माझ्याकडे आले, तर मला त्यांचं आदिरातिथ्य करता येईल. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यात काही सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही मला आंदोलनाच्या ठिकाणी बोलावलं तर कुठलीही गोष्ट मनात न ठेवता शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे. आमचे प्रामाणिक प्रयत्नस सुरु आहेत. यात स्वार्थ नाही.आर्थिक मंदी येते, तेव्हा शेती क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये भर घालू शकतं” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
“माझी सर्व शेतकरी बंधुंना हीच विनंती आहे की, आपण येणारं वर्ष जे आहे, वेधशाळेने जो अंदाज वर्तवलाय पावसाची संभाव्यता कमी आहे. एल निनोचा प्रभाव वाढला आहे. पाऊस कमी पडला, अधिकृत यंत्रणा आहेत त्यांनी सांगितलय साधरणत: 90 टक्के इतका पाऊस पडेल. त्यामुळे दृष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही” असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले. “शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना ऊस, कांदा किंवा अन्य नगदी पिकांचं नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आखातामध्ये युद्ध सुरु आहे. त्या युद्धाचा परिणाम केवळ भारताच्याच नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र, भारतात सुद्धा परिणाम
“आखाताच्या युद्धाचा महाराष्ट्र, भारतात सुद्धा परिणाम होणार आहे. किंमती वाढणं, आर्थिक टंचाई येणं, मंदी येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अर्थात शेतकऱ्यांना हा सल्ला देण्याचं कारण नाही. शेतकऱ्यांसंदर्भातील उपायोजना राज्य सरकार, केंद्र सरकारने केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत” असं दिलीप वळसे पाटील बोलले.