मोठी बातमी! शिवसेना भाजपात नाराजी नाट्य; तर भविष्यात…, शिंदे गटाचा भाजपला थेट मोठा इशारा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सध्या गोकूळ दूधसंघाचा सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. सरकारने गोकूळमध्ये चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाने या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली आहे.

मोठी बातमी! शिवसेना भाजपात नाराजी नाट्य; तर भविष्यात..., शिंदे गटाचा भाजपला थेट मोठा इशारा
'गोकूळ'वरून नाराजीनाट्य
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 4:04 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सध्या गोकूळ दूधसंघाचा सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. गोकूळमध्ये चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. महायुती सरकाच्या या निर्णयाला महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध होत आहे. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मात्र या निर्णयाचं समर्थन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने देखील या निर्णयावरून नाराजी व्यक्त करत उघड उघड इशारा दिला आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन अहीर यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले सचिन अहीर? 

Loading...

गोकुळमध्ये जे काही घडलं त्याची सगळी माहिती मला नाही, मात्र लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका व्हाव्यात ही आमची भावना आहे. कारण भविष्यात जिल्हा बँकेच्या निवडणुका होणार आहेत, मुंबई बँकेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे गोकुळमध्ये जे झालं असंच जर तिथे झालं तर मग काय करायंच? हा आमच्यापुढेही प्रश्न आहे, असं अहीर यांनी म्हटलं आहे.  दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपने जी भूमिका घेतलीये त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांचा वाराणसीत सन्मान झाला ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ते हिंदूच्या  रक्षाणासाठी कायम तत्पर असतात, काम करत आसतात, त्यामुळे हा बहुमुल्य सन्मान आम्हाला प्राप्त  झाला आहे. याचं आम्ही स्वागतच करतो, असंही यावेळी सचिन अहीर यांनी म्हटलं आहे.

सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांना फोन करून आपला पाठिंबा दर्श्वला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं यावेळी सतेज पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान भविष्यात आता हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us