AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात हाहा:कार… PoKमध्ये नागरिक रस्त्यावर, घरात घुसून गोळीबार, ड्रोनचा हल्ला

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने नागरिकांवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. रावळकोटमध्ये 3 नागरिक ठार, 18 जखमी झाले. सैन्याच्या अत्याचाराविरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले असून, केवळ पीठ-वीज नव्हे तर प्रशासकीय स्वायत्तता आणि प्रतिनिधीत्वाची मागणी करत आहेत.

पाकिस्तानात हाहा:कार... PoKमध्ये नागरिक रस्त्यावर, घरात घुसून गोळीबार, ड्रोनचा हल्ला
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 4:11 PM
Share

पाकिस्तान पुन्हा एकदा पेटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने उच्छाद मांडला आहे. पाकिस्तानी सैन्य लोकांच्या घरात घुसून गोळीबार करत आहे. ड्रोनचा हल्ला करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत तीन लोक ठार झाले आहेत. 18 लोक जखमी झाले आहेत. ही घटना रावळकोटच्या उमर फारुख चौकातील आहे. पाकिस्तानी सैनिक आज पहाटे 5 वाजल्यापासूनच या परिसरात फायरिंग करत आहेत. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकच हाहा:कार उडाला असून पाकिस्तानी नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत.

स्थानिक नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी आर्मी आम्हाला जाणूनबुजून टार्गेट करत आहे. नागरिकांच्या घरावर हल्ले सुरू आहेत. निशस्त्र आंदोलकांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. पाकिस्तानमधील ही काही एकमेव घटना नाहीये. जून 2026मध्ये निदर्शने सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये 153 नागरिकांना मारून टाकण्यात आलं आहे.

पीओकेतून आलेल्या या व्हिडीओत लोकांच्या घरांना आग लागलेली दिसत आहे. तसेच घटनास्थळीवरील शार्पनेलही लोक दाखवत आहेत. पाकिस्तानी सैन्याने आमच्या डेथ वॉरंटवर सही केल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

मुनीरच्या विरोधात लढायला…

दुसऱ्या एका व्हिडिओत सातत्याने गोळीबार होत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने रावळकोटमध्ये नागरिक आणि मुलांवर गोळीबार केला आहे. पण जनता मुनीर यांच्या नेतृत्त्वातील सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा निर्धारच या नागरिकांनी व्यक्त केला आहे.

केवळ पीठ आणि वीज नको

रिपोर्टनुसार, रावळकोटमध्ये सरकारी मोबाईल सेवा आणि इंटरनेट बंद करण्यात आले आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आपला विरोध व्यक्त करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना केवळ वीज आणि पीठ नकोय. तर त्यांना विधानसभा आणि स्थानिक संस्थांमध्ये प्रतिनिधीत्त्व हवं आहे. तसेच प्रशासनात स्वायतत्ता हवी आहे. त्यासाठीच त्यांचा लढा सुरू आहे.

Follow Us
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...