अजितदादा नकोच… ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात मोठा भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा; मोठी खळबळ

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार अशी घोषणा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने केली होती. त्यानंतर चर्चेच्या फेरी पुढे सरकताच या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यांना मुंबईला बोलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अजितदादा नकोच... ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात मोठा भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा; मोठी खळबळ
शरद पवार, अजित पवार, प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Dec 23, 2025 | 11:33 AM

Prashant Jagtap: अजितदादांसोबत आघाडी नकोच अशी भूमिका घेत शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने अखेर तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात मोठा भूकंप झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी दोन्हीकडून चाचपणी सुरू आहे. चर्चाही सुरू आहे. पण जागा वाटपाविषयी अजून दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा झालेली नाही. पण अजित पवार यांच्यासोबत आघाडी नकोच अशी भूमिका शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. या बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.

प्रशांत जगताप यांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत जगताप यांनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी नको असा सूर आळवला आहे. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांची भूमिका घेतली होती. त्यांनी महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणूक लढवल्यास काय फायदा होईल, याचे गणित मांडले. तसेच अजित पवार यांच्यासोबत निवडणूक लढवल्यास काय तोटा होऊ शकतो, याचीही माहिती मांडली होती. त्यानंतर शरद पवार यांनी दादांच्या अजितदादांसोबत न जाण्याचे ठरल्याचे प्रशांत जगताप यांनी माध्यमांसमोर जाहीर केले होते. पण त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याविषयी चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर चर्चा सुरु झाली होती.

तर प्रशांत जगताप या घडामोडींमुळे नाराज होऊन राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. प्रशांत जगताप यांनी पक्षासमोर राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचेही समोर येत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार, अशी भूमिका जगताप यांनी जाहीर केली होती. प्रशांत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता सकाळपासूनच वर्तवण्यात येत होती. अखेर त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप करणार निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जगताप उद्धव सेनेच्या वाटेवर?

प्रशांत जगताप यांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.प्रशांत जगताप हे मुंबईत जाऊन घेणार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहे. राजीनाम्याच्या प्रस्तावावर प्रशांत जगताप शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार आहे. सुप्रिया सुळे प्रशांत जगताप यांना समजूत घालणार का? याविषयीची चर्चा सुरु आहे. प्रशांत जगताप यांनी राजीनामा देऊ नये, पुणे शहरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी भूमिका मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रशांत जगताप राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशांत जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार का, याची चर्चा होत आहे.

सत्तेतील पक्षासोबत घरोबा नको

तर याप्रकरणी नुकतीच प्रशांत जगताप यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. सत्तेतील पक्षासोबत घरोबा नको. माझ्या पक्षाची विचारधारा, विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व संपू नये. कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळात हा पक्ष सांभाळला.सत्तेसाठी कुठेही सत्तेतील पक्षासोबत घरोबा केला नाही. त्यांच्यासाठीच आपली ही भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया जगताप यांनी नुकतीच दिली.

आज दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर स्थानिक पातळीवर निर्णय होणार आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पुणे शहरातील नेत्यांची एकत्र बैठक झाली. त्यात तुतारी अथवा घड्याळ यापैकी कोणत्या एकावर निवडणूक लढवणार, याविषयी आग्रह धरण्यात आले नसल्याचे समोर येत आहे. तर प्रशांत जगताप यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते सुद्धा आश्चर्यचकीत झाल्याचे समोर येत आहे.या बैठकीत जागांच्या संख्येवर चर्चा झाल्याचे समजते. कुठल्या जागेवर कुठल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट दिले जाऊ शकतं यावर देखील चर्चा झाली.