डोंबिवतील धक्कादायक प्रकार, मुली गर्भवती राहिल्यानंतर मोठं रहस्य समोर, कनेक्शन थेट उत्तर प्रदेशात
कल्याण - डोबिंवली सारख्या संस्कृतीक शहरात देखील मुली महिला सुरक्षित नाहीत... आता देखील एक धक्कादायक प्रकार समोर यत आहे. मुली गर्भवती राहिल्यानंतर मोठं रहस्य समोर आलं, एवढंच नाही तर, कनेक्शन थेट उत्तर प्रदेशात

देशात रोज महिला मुलींवर अत्याचार होत आहे, अशा परिस्थितीत आता महिलांचं जगणं कठीण झालं आहे, कल्याण – डोंबिवली येथून देखील एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना ताजी असताना डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. पण डोंबिवलीत घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे, मुलांनी त्यांच्यासोबत नेमकं काय आणि कसं घडलं याबद्दल कोणाला काही सांगितलंच नाही… अशात मोठं रहस्य समोर आलं आणि कुटुंबियांना देखील मोठ धक्का बसला. आता पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
एका प्रकरणात मानपाडा पोलिसांनी काजू निषाद या आरोपीला उत्तर प्रदेशाहून अटक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात रामनगर पोलिसांनी शुभम सरोज याला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुली गर्भवती झाल्यानंतर ही माहिती समोर आली. आहे. दोन्ही प्रकारात पोलिसांच्या तपास सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना ताजी असताना डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खोपोलीत राहणाऱ्या आणि आपल्या मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगर येथून आलेल्या एका 14 वर्षीय मुलीवर सौरभ सोनवणे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
घटना उघडकीस येऊन काही तास लोटत नाहीत तोच डोंबिवलीमध्ये दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. विशेष बाब म्हणजे, या दोन्ही मुली गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही प्रकारात पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.
सांगायचं झालं तर, देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, नातेवाईकांकडे एवढंच नाही तर, घरात देखील मुली सुरक्षित नाहीत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे मुली – महिलांनी जगायचं तरी असा प्रश्न उपस्थित आहे.