
Haseen Mastan Mirza : 1970 च्या दशकातील मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तान याची मुलगी हसीन मस्तान मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हसीन हिने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनांबद्दल सांगितलं असून थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमिक शाह यांच्याकडून मदत मागितली आहे…. व्हिडीओमध्ये हसीन हिने केलेल्या दाव्यानुसार, ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे, ती व्यक्ती आतापर्यंत कोर्टात आलीच नाही… न्याय मिळण्यासाठी हसीन हिले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा करावी लागत आहे.
महिलांच्या हक्कांवर भर देताना हसीन म्हणाली की, देशात अशा घटनांविरुद्ध कठोर कायदे करण्याची गरज आहे. हसीन हिने व्हिडीओत केलेल्या दाव्यानुसार, तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिची हत्या करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला… हसीन हिची ओळख बदलण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला… पण अद्यापही तिला न्याय मिळालेला नाही.
हसीन म्हणते, ‘गेल्या काही वर्षांपासून लढत आहे. माध्यमांकडून मदत मागत आहे… पण कोणीत माझ्यावर ओढावलेलं संकट ऐकलं नाही… आता काही माध्यमांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे… ज्यानंतर माझा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल अशी माझी आशा आहे…’
‘आपल्या देशातील कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे… आरोपी कित्येक वर्षांपासून कोर्टात हजर राहिलेला नाही… कायदे कठोर केल्यास बलात्कारासारख्या गंभीर घटना घडणार नाही. कोणाच्या हत्येचा प्रयत्न होणार नाही… शिवाय कोणची संपत्ती कोणी ताब्यात घेऊ शकणार नाही…’ व्हिडीओच्या शेवटी हसीन हात जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमिक शाह यांच्याकडून मदत मागते…
हाजी मस्तान हा मुंबईतील सुरुवातीच्या गुंडांपैकी एक होता. 1970 च्या दशकात त्याच्या नावाने अंडरवर्ल्डमध्ये भीती निर्माण झाली. नंतर तो चित्रपट निर्माता बनला. त्याच्या मृत्यूनंतर, मुलगी, हसीन मिर्झा, हिने तिच्या वडिलांच्या वारसा आणि मालमत्तेसाठी दीर्घ लढाई लढली. हसीनचा दावा आहे की, तिची ओळख लपवण्यात आली होती आणि शत्रूंनी मालमत्ता बळकावण्यासाठी तिच्यावर खोटे खटले दाखल केले होते.