संशय, गर्भपात तर कुठे शरीरसंबंधा’साठी जबरदस्ती…, मुंबईत ‘हुंडा’बळी, 2025 मधील आकडा जाणून होईल संताप

Harassment of Dowry: चारित्र्यावर संशय, गर्भपात करण्यासाठी मारहाण, तर कुठे विचित्र शरीरसंबंधा'साठी जबरदस्ती..., गावात नाही तर, मुंबईत होतायेत 'हुंडा'बळी... 2025 मधील आकडा जाणून होईल संताप

संशय, गर्भपात तर कुठे शरीरसंबंधासाठी जबरदस्ती..., मुंबईत हुंडाबळी, 2025 मधील आकडा जाणून होईल संताप
फाईल फोटो
| Updated on: Oct 14, 2025 | 12:23 PM

Harassment of Dowry: आपल्या मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं… मुलीच्या लग्नाची तयारी सुरु झाली की, लेक परक्याच धन… असं सगळे म्हणतात. मुलीवर सर्वात जास्त प्रेम आई करत, पण प्रत्येक मुलासाठी तिचा बाबा खास असतो… म्हणून लेकीच्या लग्नात बाबा आतून तुटतो… आपली लेक एक दिवस दुसऱ्या घरी जाईल हे आई – वडिलांना माहिती असतं… आणि त्यांच्यासाठी तो गोठलेला क्षण असतो… अखेर लेकीचं कन्यादान होतं आणि लेक सासरी जाते…

सासरचं सगळं चांगलं आहे. संपत्ती, मालमत्ता सर्वकाही आहे.. म्हणून लेक सुखी आहे असं आई – वडीलांना वाटतं. पण त्यांच्या लाडक्या लेकीवर तर सासरी अन्याय होत असतो… सर्वात धक्कायक सत्य परिस्थिती म्हणजे आजही मुलींवर सासरी अन्याय होत आहे. आपण म्हणतो गावात मुलींवर सासरी छळ होतात. पण असं नाहीये… झोपडपट्टीमध्येच नाही तर उच्चभ्रू इमारतींमध्येही मोठ्या प्रमाणात छळाचे सत्र सुरु आहे…

मुंबईसारख्या शहरात आणि देशाच्या आर्थिक राजधानीतही अनेक घरांमध्ये हुंड्यासाठी महिलांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ केला जातो. धक्कादायक गोष्ट म्हणजे, 2025 मधील आकडे देखील समोर आले आहेत. ज्यामुळे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहे..

चालू वर्षात जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान छळाच्या 314 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर हुंड्यामुळे 9 महिलेचा मृत्यू झाला आहे. यात हुंड्यामुळे 4 तर 5 महिलांनी सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवलं आहे. 314 या दाखल झालेल्या तक्रारी आहेत, पण ज्या तक्रारी दाखल झाल्याच नाहीत, त्यांची संख्या किती असेल?

मुंबई शहरातील ही संख्या असल्यामुळे ही मोठी खंत आहे असं म्हणायला हरकत नाही… चारित्र्यावर संशय, मंगळदोष आणि ‘विचित्र शरीरसंबंधा’साठी जबरदस्ती अशी अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. धक्कादायक म्हणजे, व्यवसायासाठी 6 कोटी रुपये आणण्यास सांगितल्याने महिलेला माहिममध्ये अमानुष मारहाण केली. तर गर्भपात करण्यासाठी देखील महिलांची मारहाण करण्यात आली… अनेक प्रकरणांत सासरचे लोकही हुंड्याच्या मागणीसाठी मुलाला पाठिंबा देत असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे..

2023 आणि 2024 मधील चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. 2023 मध्ये 766, तर 2024 मध्ये 458 हुंड्यासाठी छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 2025 मध्ये जुलैपर्यंत 314 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत… हे समाजातील एक धक्कादायक वास्तव आहे.