
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराचं स्मारक उभं राहतय. जगाला हेवा वाटाव असं स्मारक उभ राहतय. तमाम देशवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आज बाबासाहेबांचा जयंती उत्सव आहे. बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच, पण माणुसकीचे सुद्धा शिल्पकार आहेत. माणसाने कसं जगावं, शिका, संघिटत व्हाव, संघर्ष करा, न्याय मिळवा हे बाबसाहेबांच बीद्र वाक्य होतं. म्हणून मी बाबासाहेबांना विन्रम अभिवादन करतो” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आमच सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारांवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालणारं आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना सर्वसामान्यांना न्याय देणारी घटना आहे. म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या देशाचे पंतप्रधान झाले. शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. एक आदिवसी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली” या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. “ही जादू, किमया बाबासाहेबांच्या घटनेची आहे. म्हणून मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं?’
आज दादर शिवाजी पार्क चैत्यभूमीवर सरकारच्यावतीने मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांचं पूर्वनियोजित भाषण झालं नाही. यावर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना तुम्ही नाराज आहात का? म्हणून विचारलं. त्यावर ते म्हणाले की. “नाराजी कोणाची? बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर जाणं. बाबसाहेबांच दर्शन घेणं, त्यांना विनम्र अभिवादन करणं, यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं?” “भाषणापेक्षा बाबासाहेबांच दर्शन मला मोठं होतं. मी सांगू तुम्हाला, प्रत्येकाने बाबासाहेबांचा एकतरी गुण घेतला पाहिजे. बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी मिळाला, तरी मनुष्यजीवन सार्थक होईल. यापेक्षा दुसरं काय महत्त्वाच” असं एकनाथ शिंदे म्हणाले.