डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अंदुरेच्या जन्मठेपेला स्थगिती, जामीनही मंजूर
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आलं आहे. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई हायकोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सुनावलेली जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टातील न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिल्याची माहिती हाती आली आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज मंगळवारी सुनावणी झाली. य प्रकरणातील आजच्या सुनावणीत हायकोर्टाच्या खंडपाठीने मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर केला. तर या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर केलाय. अंदुरेने वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या माध्यमातून विशेष यूएपीए कोर्टाच्या 10 मे 2024 रोजीच्या निकालाला आव्हान दिलं होतं. त्याने अंतिम निकालापर्यंत जामीन आणि जन्मठेपेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
सीबीआयने कोणतीही ओळख परेड घेतलेली नाही, असं म्हणत अंदुरेने जामीन मागितला होता. तर कोर्टात काही साक्षीदारांनी त्याला ओळखले. परंतु त्याच्या वकिलांनी प्रत्यक्षदर्शींच्या विधानात विसंगती निदर्शनास आणून दिली. काहींनी अंदुरेनेच दाभोलकरांवर गोळीबार केल्याचा दावा केला. तर काहींनी घटनास्थळी पाहिले नसल्याचे सांगितले आहे.
दाभोलकरांच्या कुटुंबाकडून अंदुरेच्या जामिनाला विरोध
सचिन अंदुरेच्या जामिनाला आंदोलन दाभोलकरांच्या कुटुंबाने विरोध केला. ‘अंदुरेला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. फक्त नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी या विचारवंताची अशीच हत्या करण्यात आली होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आला होता, असा युक्तिवाद दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी केला.
तत्पूर्वी, विशेष कोरटाने अंदुरे आणि कळसरकरला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत हत्या आणि कलम 34 अंतर्गत दोषी ठरवले होते. त्याचबरोबर कोर्टाने सहआरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, वकील संजीव पुनाळेकर यांनाही निर्दोष मुक्त केलं आहे. त्यांना कोर्टाने बेकायदेशीर कृत्ये कायदाच्या कलम 16 आणि शस्त्र कायद्याअंतर्गत दहशतवादी कृत्यांसाठी दोषी ठरवलं नव्हतं.