AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : 15 लाख जणांच्या नोकऱ्या जाणार, अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत; आदित्य ठाकरेंच्या आकडेवारीने राजकारणात वादळ

हिंजवडी आयटी पार्कशी संबंधित 15 लाख लोकांच्या जाणार असल्याचा दावा ठाकरेंनी केला आहे. ठाकरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Aaditya Thackeray : 15 लाख जणांच्या नोकऱ्या जाणार, अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत; आदित्य ठाकरेंच्या आकडेवारीने राजकारणात वादळ
aaditya thackeray newsImage Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2026 | 1:53 PM
Share

माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यातील विविध शहर, जिल्ह्यांना भेटी देत आहेत. चाकण दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची देखील पाहणी केली. या पाहणीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना धक्कादायक दावा केला. हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी याच्या आकडेवारीने एकच खळबळ उडाली आहे. सरकारने लक्ष देऊन लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

अनेकांच्या नोकरीवर गदा येणार, ठाकरेंचा दावा 

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत आहे. या कंपन्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही. रस्ते, पाण्याच्या समस्या आहेत. वीजेची समस्या आहे. हिंजवडीमधून अनेक मेसेज आले. हिंजवडीमध्ये मोठं आयटी पार्क आहे. या आयटी पार्कवर जवळपास साडेसहा लोक थेट अवलंबून आहेत. तसेच जवळपास 15 लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या या भागातून रोजगार मिळतो. या भागात वाहतूक कोंडी वाढत आहे, असे मागील तीन वर्षांपासून ऐकत आहे. समस्या सोडवल्याने लोकांची जीवनशैली सुधारेल’.

…तरच नोकऱ्या वाचतील, असे ठाकरे म्हणाले

‘स्थानिक, ग्रामस्थ, नोकरदारांकडून समस्या समजून घेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर फुटपाथ नाही. मेट्रो चालू नाही. दोन-तीन महिन्यांपासून मेट्रो सुरू नाही. त्याच्या उद्घाटनाची तारीख मिळेना झाली आहे. ही गोष्ट म्हणजे पाइपगॅस सर्वच इमारतीत नाही. कचऱ्याची समस्या आहे. इथे कोणी लक्ष देत नाही. काही चौकात PWD, PMRDA, PCM या तिन्ही संस्थेचे रस्ते आहेत. असा गोंधळ पाहायला मिळत आहे. मागील तीन चार वर्षांत नवीन कंपन्या आलेल्या नाहीत. आताच्या कंपन्या विचार करत आहे की, फेज तीनमधून फेज एक मध्ये जाण्यासाठी एक- दीड तास लागत आहे. हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काही संघटना मागच्या वर्षी मुख्यमंत्र्‍यांना भेटल्या. अनेक मदत मागत असतात. वाहतूक कोंडीची समस्या आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. सिग्नल आहे. स्मार्ट सिग्नल हवेत. रस्ते व्यवस्थित नाही. तीन-चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं तर मोठा दिलासा मिळू शकतो. काही मुद्दांवार काम केल्यास राज्य सरकार नोकऱ्या वाचवू शकते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा