पनवेलमध्ये मोठा अपघात, गाडी चालवताना आला हार्ट अटॅक; 15 मिनिटं हृदय बंद पडूनही वाचले प्राण

पनवेलमध्ये एका अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे.

पनवेलमध्ये मोठा अपघात, गाडी चालवताना आला हार्ट अटॅक; 15 मिनिटं हृदय बंद पडूनही वाचले प्राण
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2025 | 6:29 PM

तळोजा येथील ३२ वर्षीय रहिवाशी अनिकेत नलावडे यांना गाडी चालवताना हार्ट अटॅक आला. त्यामुळे मोठा अपघात झाला. झालेल्या अपघातात दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मात्र या अपघातात १५ मिनिटांच्या वर हृदय बंद राहून अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिक रित्या जीव वाचलेला आहे.

घरात असताना छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेवून कार चालवत हॅास्पीटलमध्ये चालले होते. मात्र कळंबोली जवळ पोहोचताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या झटक्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यांची गाडी जाऊन बाईकला आदळली. गाडीने बाईकस्वराला चांगलेच उडवले. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

गाडीत अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना बाहेर काढून कळंबोली येथील व्हाईट लोटस रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॅाक्टरांनी तपासले असता त्यांचे हृदय आणि बीपी पुर्णपणे बंद झाले होते. जवळपास मृत्युच्या दारात अनिकेत नलावडे पोहोचले होते. मात्र नामवंत हृदयरोगतज्ञ डॅा विजय डीसूजा यांनी त्वरीत उपचाराला सुरवात केली. पुढील एक तासात उपचार करत त्यांनी अनिकेत नलावडे यांना शुध्दीवर आणून प्राण वाचविले. आत्तापर्यंत ५० हजारांपर्यंत हृदयासंबंधीत शस्त्रक्रिया करणाऱ्या डॅा विजय डिसूजा यांच्यासाठी, ही घटना चमत्कारीक होती. दरम्यान छातीत दुखायला लागल्या नंतर स्व:ता गाडी चालवू नका असा सल्ला डॅाक्टरांनी दिला आहे.