Sushma Andhare : ड्रग्स प्रकरण, बंधु प्रकाश शिंदेंवरुन सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खळबळजनक आरोप

कोर्टाने सांगितलं आहे की FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे. याची FIR ऑनलाइन का आली नाही?. पोलिसांनी प्रेस नोट काढली. यात 3 नाव नाहीत. नावं समोर येऊ दिली नाहीत. कायम नजर सय्यद, राजिकुल खलीलूल रहेमान यांचं नाव यात का नाही? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत.

Sushma Andhare :  ड्रग्स प्रकरण, बंधु  प्रकाश शिंदेंवरुन  सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खळबळजनक आरोप
Sushma Andhare
| Edited By: | Updated on: Dec 17, 2025 | 12:41 PM

“आजची पत्रकार परिषद ही राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन करत आहे. ही पत्रकार परिषद राज्याच्या भविष्याशी संबंधित आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करेन की, त्यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. राजकारण बाजूला ठेवून माझ्यासोबत नागरिक म्हणून उभे राहतील ही अपेक्षा आहे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “उके यांनी याआधी भूमिका मांडली होती. त्यांच्यावर रेड टाकली तशीच मला देखील काळजी आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर देखील काय झालं हे राज्याने बघितलं आहे. 13 तारखेला सकाळी सावरी गावात ड्रग्स कारवाई झाली. एकूण 3 कारवाया झाल्या आहेत. वर्धा, मुलुंड आणि पुण्यात कारवाई झाली” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“विशाल मोरे अजित पवार यांचा पदाधिकारी आहे. त्याला ताब्यात घेतलं. सावरी गावात एक कारवाई झाली. साताऱ्यापासून 40 km अंतरावर असणारं गाव आहे. या गावात कारवाई झाली. मी त्या गावात जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे. या कारवाई मध्ये 45 किलो ड्रग्स सापडलं आहे आणि त्याची किंमत 115 कोटी रुपये इतकी आहे” असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. “तिथ जे रिसोर्ट आहे, तो प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा आहे. ज्या शेड मध्ये ड्रग्स सापडले ते गोविंद शिंदकर यांच्या मालकीच आहे. ओमकार डीगे याच्याकडे चावी होती. त्याला अटक करून सोडून दिल आहे” असं अंधारे म्हणाल्या.

एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत

“साताऱ्यात जाऊन मुंबई पोलिसांनी का कारवाई केली?. आत्मजीत सावंत या पोलीस अधिकाऱ्याने ही कारवाई केली. तिथून अजून एक माणूस फरार झाला, त्याचं नाव रणजीत शिंदे आहे. हा रणजीत शिंदे युवसेनेचा तालुका प्रमुख असून शिंदे यांच्या गावाचा सरपंच आहे. प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. या ठिकाणी अजून 3 लोक राहत होते. कायम सय्यद, हाबीजुल इस्लाम, खालील रेहमान ही तीन माणसं या शेड मध्ये राहत होती. हे आसाम मधून कसे आले? यांना कुणी आणलं? या रॅकेट मध्ये बांगलादेशी देखील होते. आता यांच्यावर कुणी प्रश्न का उपस्थित करत नाही?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

FIR समोर येऊ दिली नाही

“तुषार दोषी हे साताऱ्याचे sp आहेत. त्यांनी माहिती लपवली आहे. का लपवली ही माहिती? हे लोक तिकडे काम काय करत होते? तिकडे का राहत होते?” असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. “या तीन लोकांना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेल वरून जात होते. या सगळ्या प्रकरणी FIR समोर येऊ दिली नाही” असं त्या म्हणाल्या.