मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का, थेट काही नगरसेवक…

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची कामगिरी चांगली राहिली. एमआयएमनेही मोठी कमाल केली. आता या निवडणुकीमध्ये मोठा टिविस्ट आला.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का, थेट काही नगरसेवक...
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 19, 2026 | 8:24 AM

राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, महापाैरपदाचा तिढा वाढल्याचे सध्या बघायला मिळतंय. मुंबई महापालिकेचा निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. मुंबई महापालिकेतही भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपा 89, शिवसेना शिंदे गट 29 याप्रमाणे युतीचे उमेदवार निवडून आले. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत ही निवडणूक लढवली. पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापाैर बसणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, असे असले तरीही शिंदेंनी मोठी अट ठेवल्याची माहिती सुत्रांकडून मिळतंय. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. ताज लॅन्डमध्ये शिंदेंची नगरसेवक मुक्कामी आहेत. अडीच वर्ष आम्हाला महापाैर पद हवे असल्याची शिंदेंची मागणी आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा करत म्हटले की, आमचा महापाैर व्हावा, ही आजही आमची इच्छा आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची कामगिरी चांगली राहिली. एमआयएमनेही मोठी कमाल केली. खरे अपयश महापालिका निवडणुकीमध्ये कोणाला मिळाले असेल तर ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. अजित पवारांचे राजकीय वलय संपताना स्पष्टपणे दिसत आहे.

मुंबई महापालिकेच्या महापाैरपदावरून विविध दावे केले जात असतानाच आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी पुढे येत आहे. नुकताच ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती आली. हा मोठा धक्का म्हणावा लागेल. देवाची इच्छा असेल तर आमचा महापाैर होऊ शकतो, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट म्हटले. मात्र,आता उद्धव ठाकरे यांचेच नगरसेवक नॉच रिचेबल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली.

बहुमत मिळूनही विरोधी बाकावर बसण्याची इच्छा नगरसेवकांची नसल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. सध्या त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहेत. महापाैरच्या मुद्दयावर शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला प्रवेश करताना दिसत आहेत.