AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सिंधुदुर्गमध्ये भूकंप सदृश धक्के; भिंतींना तडे, घरांचे मोठे नुकसान

Earthquake : सिंधुदुर्गमध्ये भूकंप सदृश धक्के जाणवले आहेत. कणकवली फोंडाघाट विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात भूकंप सदृश धक्के जाणवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! सिंधुदुर्गमध्ये भूकंप सदृश धक्के; भिंतींना तडे, घरांचे मोठे नुकसान
Earthquake in SindhudurgImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 24, 2026 | 4:10 PM
Share

सिंधुदुर्गमध्ये भूकंप सदृश धक्के जाणवले आहेत. कणकवली फोंडाघाट विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात भूकंप सदृश धक्के जाणवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या 4 घरे बाधित झाली असून भिंतीना मोठ्या भेगा पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बेलदारवाडी परिसरातील घरांना तडे

समोर आलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, फोंडाघाट, विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात भूकंप सदृश धक्के जाणवले आहेत. या घटनेत 4 घरांच्या भींतींना तडे गेले असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी सकाळी संबंधित परिसराला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मात्र हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता याबाबत माहिती समजू शकलेली नाही.

शासनाकडे मदतीची मागणी

भूकंपाच्या या घटनेबाबत बोलताना फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मी बेलदारवाडी परिसराला भेट दिली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेअकराच्या आसपास धक्के जाणवले. पत्र्यांचा आवाज झाला. मात्र सकाळी उठून पाहिले असता जवळपास 4 घरांच्या भींतींना भेगा पडल्या आहेत, जमिनीलाही भेगा पडल्या आहेत. शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त घरांच्या मालकांना नुकसानभरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.

भूकंपाची तीव्रता कशी मोजतात?

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. रिश्टर स्केलवर भूकंप तीव्र आहे की सौम्य हे ओळखता येतो, यावरुन किती नुकसान झालं असेल याचा देखील सहज अंदाज येतो. एक युनिटने जेव्हा रिश्टर स्केल वाढतो, तेव्हा त्याची ऊर्जा दहापटीने वाढते. रिश्टर स्केल – रिश्टर मापन ही नेमकी भूकंपाची धक्क्याचे प्रमाण आणि त्याची बाहेर पडण्याची ऊर्जा मोजण्याचे काम करते. रिश्टर स्केलवरच भूकंपाची तीव्रता ठरते, म्हणून केव्हाही भूकंपाची माहिती आल्यावर तो किती रिश्टर स्केलचा आहे, याची माहिती सर्वात आधी दिली जाते.

Follow Us
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?