मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनी कोरोनाबाधित; संपर्कात आलेल्या इतरांचा शोध

मिरजच्या वैद्यकीय महालिद्यालयातून धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित आठ विद्यार्थीनींचा कोरोना चाचणी अहवाला पॉझिटिव्ह आल्याने महाविद्यालय प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनी कोरोनाबाधित; संपर्कात आलेल्या इतरांचा शोध
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 28, 2021 | 7:06 AM

सांगली: मिरजच्या वैद्यकीय महालिद्यालयातून धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित आठ विद्यार्थीनींचा कोरोना चाचणी अहवाला पॉझिटिव्ह आल्याने महाविद्यालय प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. या विद्यार्थीनींना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विलगिकरण कक्षात उपचार

या सर्व मुली मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतात. त्यांना अचानक त्रास जाणू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या विद्यार्थीनींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

संपर्कात आलेल्यांचा शोध

दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने, रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. संबंधित कोरोनाबाधित विद्यार्थी कोणाकोणाच्या संपर्कांत आल्या होत्या, याचा शोध सुरू आहे. आता त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती  प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. मार्चदरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी

Suicide note | सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!

धाकधूक वाढली! ठाण्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या सात वर; घाणामधून आलेल्या चार जणांना लागण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें