
पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक केली. या प्रकरणातील अहवाल थेट राज्य महिला आयोगाने पोलिसांकडून मागवला. काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिशय धक्कादायक अशी आरोप केली, ज्यानंतर राज्यातील राजकारण खळबळ उडाल्याचे बघायला मिळातंय. आता एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केली आहेत.
एकनाथ खडसे म्हणाले की, प्रफुल लोढाला जेलमध्येच संपवण्याचे काम केले जातंय. यासोबतच त्यांनी मोठी भीती व्यक्त करत म्हटले की, प्रफुल लोढा याला जेमध्येच मारून टाकण्याचे काम केले जाऊ शकते. प्रांजल खेवलकर प्रकरणात तपास करणाऱ्या संस्था या रूपाली चाकणकर यांच्याच आहेत. माझं म्हणण आहे की, कोणीही तपास करू द्या फक्त सत्य पुढे आले पाहिजे आणि हे पोलिसांनी सांगावे.
पुढे खडसे म्हणाले, प्रफुल लोढा प्रकरणात यांचा एक मंत्री अडकला आहे. हे माझं म्हणणं आहे. त्याला महिना झालं अटक करून ठेवले आहे. तो कदाचित मरूणही जाईल. कस्टडीमध्ये सांगता येत नाही या लोकांना हे लोक असे षडयंत्र रचत आहेत, त्याला मारूनही टाकतील, काही खात्री नाही, असे त्यांनी म्हटले. रूपाली चाकणकर यांनी केलेल्या कालच्या आरोपानंतर रोहिणी खडसेचे पती प्रांजल खेवलकरचे पाय खोलात असल्याचे बघायला मिळतंय.
रूपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकरबद्दल धक्कादायक खुलासे केले. त्यांनी थेट म्हटले की, प्रांजल खेवलकर याने या हॉटेलमध्ये पहिल्यांदा अशाप्रकारची पार्टी केली नाही तर यापूर्वीही तिथे अशाप्रकारच्या पार्ट्या करण्यात आल्या. पोलिसांना खेवलकरच्या फोनमध्ये मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ मिळाली आहेत. काही व्हिडीओंमध्ये तर स्वत: खेवलकर हा दिसतोय. चित्रपटात काम देतो म्हणून मुलींना अमिष दाखवून त्यांना बोलावले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केली, जायची असे चाकणकरांनी म्हटले आहे. आता या प्रकरणावर रोहिणी खडसे काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.