
नुकताच एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या जावायचं नाव देखील समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ माजली आहे. अशात रेव्ह पार्टी म्हणजे काय आणि कशी सेलिब्रेट करतात? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… तसेच, आणखी एक प्रश्न असा आहे की जर कोणी रेव्ह पार्टीला गेला आणि तिथे ड्रग्जचे सेवन केले नाही, तरीही पोलिस त्याला अटक करू शकतात का?
रेव्ह पार्टी म्हणजे असा एक सोशल इव्हेंट, ज्यामध्ये काही लोकं ठरलेल्या जागी भेटतात आणि खातात – पीतात. डान्स करतात. ज्या पार्ट्यांमध्ये कोणत्याच मर्यादा नसताात अशा पार्ट्यांना रेव्ह पार्टी असं म्हणतात. बऱ्याचदा अशा पार्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक म्यूजिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लोक या इलेक्ट्रॉनिक म्यूजिकच्या तालावर नाचतात, ज्याला रेव्ह पार्टी म्हणतात.
रेव्ह पार्टीमध्ये डान्स आणि मस्ती रंगलेली असते. पण मस्तीच्या नावाखाली अश्लील प्रकार देखील पार्टीत सुरु असतात. ड्रग्सचा वापर देखील रेव्ह पार्टीमध्ये होत असतो. ज्यामुळे रेव्हा पार्टीवर पोलीस धाड टाकतात आणि कारवाई करतात. जेव्हा पोलीस अशा पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा त्यांना मद्यपी किंवा मद्यधुंद अवस्थेत असलेले लोक आढळतात, तेव्हा पोलीस त्यांना ताब्यात घेतात आणि पुढील कारवाई करतात. अनेकदा जोडपे या पार्ट्यांमध्ये प्रवेश करतात आणि मुले आणि मुली एकत्र मजा करतात आणि नाचतात. नशेमुळे पोलिस पार्टीत कारवाई करतात.
भारतात रेव्ह पार्टीसाठी कोणता विशेष कायदा नाही. पण जर कोणत्या पार्टीमध्ये अन्य नियमांचं उल्लंघन होत असेल तर, कारवाई केली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला एखाद्या पार्टीच्या म्यूजिकची समस्या असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, जर रेव्ह पार्टी नावाच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज आढळले किंवा कोणी मद्यधुंद आढळले तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
पोलिसांच्या अटकेबद्दल सांगायचं झालं तर, रेव्ह पार्टीला उपस्थित राहणं हा गुन्हा नाही. एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, रेव्ह पार्टीला उपस्थित राहणं हा गुन्हा नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती ड्रग्जसह सापडत नाही किंवा ती ड्रग्ज वापरत नाही, खरेदी-विक्रीत सहभागी नाही.. अशा पार्ट्यांवर कारवाई होत नाही. ड्रग्स किंवा नशेच्या पदार्थांचा वापर न करत पार्टी केली तर, त्यावर कारवाई होत नाही.