दरड कोसळण्याचा धोका असलेल्या डोंगरउतारावरील गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार : एकनाथ शिंदे

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाड शहर जलमय झालं आहे. तर डोंगरउतारावर वसलेल्या तळीये कोंडाळकरवाडी या गावात गुरुवारी दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं.

दरड कोसळण्याचा धोका असलेल्या डोंगरउतारावरील गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार : एकनाथ शिंदे
तळीये दरड दुर्घटनेनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 8:00 AM

रायगड : डोंगरउतारावर वसलेल्या गावांना दरड कोसळण्यापासून असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनासाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील महाडजवळील तळीये कोंडाळकर वाडी (Taliye Landslid) या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाड शहर जलमय झालं आहे. तर डोंगरउतारावर वसलेल्या तळीये कोंडाळकरवाडी या गावात गुरुवारी दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. शुक्रवारी पहाटेपासून एनडीआरएफची टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने इथे बचावकार्य सुरु झालं. दिवसभरात 36 मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. अंदाजे 80 ते 85 मृतदेह या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

ठाण्याहून विशेष वैद्यकीय पथक

रात्री उशिरा मुसळधार पावसात प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना एनडीआरएफच्या पथकाला केली. मृतांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. याशिवाय ठाण्याहून विशेष वैद्यकीय पथक आणि टीडीआरएफचं पथक महाडमध्ये पोहोचले असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.

यापूर्वी देखील रायगड जिल्ह्यातील जुई गाव आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जवळील माळीण गावात दरड कोसळून संपूर्ण गावच्या गाव जमिनीखाली नाहीस झालेलं होतं, त्यानंतर तळीये कोंडाळकरवाडीच्या रूपाने पुन्हा एकदा तशीच दुर्घटना घडल्याने या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलून अशा गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचे धोरण तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Satara Landslide : मध्यरात्री 2 वाजता डोंगराचा भाग कोसळला, घरं दबली, 12 मृत्यू, साताऱ्याच्या संपूर्ण घटनेचा थरार

(Eknath Shinde assures to prevent landslide in villages on mountains in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.