महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मुंबईतून मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरूच आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे उमेदवार तब्बल 232 जागांवर विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावलं लागलं.
दरम्यान विधानसभेत झालेल्या मोठ्या पराभवानंतर आता महाविकास आघाडीला गळती लागल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातून अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे. ही पक्षगळती शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरली असून, तीला ब्रेक लावण्याचं मोठा आव्हान आता पक्षासमोर असणार आहे.
दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 300 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील हे सर्व कार्यकर्ते आहेत. वांद्रे पूर्व येथे एका कार्यक्रमात कुणाल सलमळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते 300 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचा देखील समावेश आहे. राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे निवडणुकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
आज शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 300 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील हे सर्व कार्यकर्ते आहेत. वांद्रे पूर्व येथे एका कार्यक्रमात कुणाल सलमळकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
