
मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार प्रचार करत आहेत. आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांनी काल केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये अदानींना देशातील बहुतांशी उद्योग दिल्याचा आरोप केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींनी महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले. तुमच्या राज्यात काहीच मिळालं नाही. तुम्ही कधी मागायला गेला नाही. इतका इगो होता. त्याच मोदींवर आता टीका करत आहात. अयोध्येत राम मंदिर बांधलं. 370 कलम रद्द केलं. त्यांना तुम्ही शिव्या देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची. 10 वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येत आहे. दावोसला मुख्यमंत्री जाणार आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक येणार आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुंबईची मोकळी मैदाने आणि भुखंड कुणी दिली. या उद्योगपतींशी कुणाकुणाबरोबर संबंध आहे. दीड दोन वर्षापूर्वी उद्योगपती कलानगरला कुणाच्या घरी गेले, बंद दाराआड चर्चा कुणाशी केली. तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही. ही कसली डिनर डिप्लोमसी. कंटेनर तुमच्या यार्डात पोहोचले नाही का. आमच्यावर कसले आरोप करता. यह जनता है सब जानती है. ज्यांची नावे घेता त्यांना जेवायला बोलावता. तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात. तुमचे नकाशे पाहून जयंत पाटील कावरे बावरे झाले. आधी काय परिस्थिती होती. आता काय झाली. जब चाहीए हरी पत्ती तब याद आती है उद्योगपती. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आणि मुंबई फर्सट हेच आहे.