संजय गायकवाड गोत्यात! मोठी कारवाई होणार; एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांविषयी केलल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाल्याचे सांगण्यात आलं आहे.

संजय गायकवाड गोत्यात! मोठी कारवाई होणार; एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
eknath shinde
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 10:47 AM

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांविषयी केलल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. यामुळे आमदार संजय गायकवाड यांचे टेन्शन वाढलं आहे. परंतु आमदार संजय गायकवाड यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार , हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मातीलाही जाऊ नये, असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं. संजय गायकवाड यांच्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले होते. काहींनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर काहींनी त्यांच्या विधानाचे समर्थन केल होते. परंतु आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यावरील विधानावरून शिंदे गटात नाराजी पसरल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मोठी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील संतप्त झाल्याची माहिती आहे.

Loading...

शिंदे गट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत आहे, यादरम्यान संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटाची प्रतिमा नाहर मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.  शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत शिंदे संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या हकालपट्टीची मागणी

आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरून आरपीआय नेते सचिन खरात यांनीही संताप व्यक्त केला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी. त्यानतंर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि शेजारील ठाणे येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावे, अशी मागणी सचिन खरात यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us