उपमुख्यमंत्री शिंदे मराठवाड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची माहिती समोर
उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात येणार आहेत. मनोज जरांगेंच्या धमकीनंतर शिंदेंचा परभणी दौरा चर्चेत आला. त्यांच्या दौऱ्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्यातील परभणीत दौरा आहे. परभणीतील दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सभेला दुपारी एक वाजता सुरुवात होणार आहे. परंतु शिंदेंच्या सभेत गोंधळ घालणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतरही एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा करणार आहेत. त्यांचा दौरा रद्द होणार नसल्याचेही समोर आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युवा शेतकरी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. या सभेला मराठवाड्यातील महायुतीचे नेते त्याचबरोबर आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केलेले खासदार देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
कसा असेल शिंदेंचा दौरा?
एकनाथ शिंदे यांचा ३० ऑगस्ट, २०२६ रोजीचा मुंबई-नांदेड-परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम
सकाळी ११.०० वा.
मुंबई / ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे जाणार
सकाळी ११.३० वा.
मुंबई विमानतळ येथे आगमन व विमानाने नांदेड विमानतळाकडे जाणार
दुपारी १२.१५ वा.
नांदेड विमानतळ येथे आगमन, हेलिकॉप्टरने परभणीकडे जाणार
दुपारी १२.४० वा.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेलिपॅड, जि. परभणी येथे आगमन व मोटारीने वसमत रोड, परभणीकडे जाणार
दुपारी १२.५० वा.
खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
स्थळ :- शिवाजी कॉम्प्लेक्स, वसमत रोड, परभणी
दुपारी ०१.०० वा.
मोटारीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणीकडे जाणार
दुपारी ०१.०५ वा.
शिवसेना पक्ष मेळावा / शेतकरी व युवा संवाद मेळावा
स्थळ: प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी
दुपारी ०२.३० वा.
कारने जितूर रोड, परभणीकडे जाणार
खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार
स्थळ :- बाळासाहेब ठाकरे नगर, जिंतूर रोड, परभणी
दुपारी ०३.१५ वा.
कारने अक्षदा मंगल कार्यालय, परभणीकडे जाणार
दुपारी ०३.३० वा.
विविध क्षेत्रातील मान्यवर व शिष्टमंडळ यांच्यासमवेत सदिच्छा भेट व चर्चा करणार
स्थळ अक्षदा मंगल कार्यालय, परभणी
सायं. ०४.३० वा.
कारने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेलिपॅड, जि. परभणीकडे जाणार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेलिपॅड, जि. परभणी येथे आगमन व हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे जाणार
सायं. ०४.५५ वा.
नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे जाणार
सायं. ०५.४५ वा.
मुंबई विमानतळ येथे आगमन व कारने मुंबई / ठाणे निवासस्थानकडे जाणार
सायं. ०६.१५ वा.
मुंबई/ ठाणे निवासस्थान येथे आगमन व राखीव.