AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने जे हिरवलं त्याच्या भरपाईसाठी मुख्यमंत्री शेताच्या बांधावर, 24 तासांच्या आत तीन जिल्ह्यांचा दौरा

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून मदतीची आस आहे. शेतकऱ्यांच्या या आशेची जाणीव लक्षात ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याचा धडाकाच लावला आहे.

अवकाळी पावसाने जे हिरवलं त्याच्या भरपाईसाठी मुख्यमंत्री शेताच्या बांधावर, 24 तासांच्या आत तीन जिल्ह्यांचा दौरा
| Updated on: Apr 11, 2023 | 5:05 PM
Share

मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातला माल विकून चांगलं आयुष्य जगावं, इतकीच त्यांची भाबडी अपेक्षा होती. पण नियतीने त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. अचानक वादळी वारे वाहू लागले, पाऊस सुरु झाला, गारा पडल्या आणि होतं नव्हतं ते सारं पीक कोलमडून पडलं. तळहाताच्या फोडापेक्षा जास्त ज्या पिकांची काळजी घेतली तीच पीकं अवकाळी पावसामुळे नष्ट झाली. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरा करण्याचा धडाकाच लावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक जिल्ह्यात जाऊन अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. सर्व शेतकऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या या दौऱ्यानंतर तातडीने कृषी विभागाने नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल शासन दरबारी सादर केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्य सरकारने काल तब्बल 177 कोटी रुपये राज्यभरातील जिल्ह्यांना मदतीसाठी वाटले. अधिकारी पंचनामे करुन लगेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हे पैसे देणार आहेत.

एकनाथ शिंदे नाशिकनंतर अहमदनगरमध्ये दाखल

एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक दौरा केल्यानंतर आज सकाळी ते अहमदनगरतच्या दौऱ्याला निघाले. तिथेदेखील त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तिथेही ते शेताच्या बांधावर पोहोचले. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अहमदनगरच्या वनकुटे गावात नुकसानीची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हिरामण बर्डे यांच्या घराची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे बर्डे यांच्या घराचं नुकसान झालंय. वनकुटे गावात अनेक घरांची पडझड झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी खासदार सुजय विखे पाटील हे देखील तिथे आले होते. यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घराबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतलाय की, शासकीय जमीन देऊन त्यांना घरकूल योजनेतून एक वर्षात घर बांधलं जाईल, असं सुजय विखे पाटील यांनी दिली. “मी स्वत: सूचना दिलेल्या आहेत. विविध पातळीवर पंचनामा होतील. सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही बळीराजांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना एनडीआरएफचे नॉर्म डावलून दुप्पट देण्याचा निर्णय घेतलाय. आपण जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यादरम्यान दिली.

अहदनगरनंतर शिंदे धाराशिवला पोहोचले

अहमदनगरच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात पोहोचले. धाराशिवमध्ये दाखल होताच त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी सुरु केली. मुख्यमंत्री धाराशिवमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच तेथील वाडी बामणी गावात पाहणीसाठी पोहोचले. या गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.