Gokul News : गोकुळसाठी 80 लाख खर्च करण्याचा सरकारी निर्णय शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याला नाही पटला, थेट बोलला हे लोकशाहीला धरुन नाही

Gokul News : "भोंदू 'खरात बाबा' प्रकरणात रूपाली चाकणकर यांची विविध संस्था आणि ईडीमार्फत चौकशी झाली, मात्र 7-8 महिने उलटूनही तो चौकशी अहवाल अद्याप जनतेसमोर का आला नाही"

Gokul News : गोकुळसाठी 80 लाख खर्च करण्याचा सरकारी निर्णय शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याला नाही पटला, थेट बोलला हे लोकशाहीला धरुन नाही
Eknath Shinde
| Updated on: Nov 24, 2026 | 9:35 AM

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी संचालक नेमण्याच्या प्रक्रियेत शासनाकडून 80 लाख रुपये खर्च करण्यात आल्याच्या मुद्द्यावर रवींद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे. रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे पुण्यातील नेते असून ते सातत्याने भाजपला लक्ष्य करतात. ​”गोकुळ ही शेतकऱ्यांनी शून्यातून उभी केलेली संस्था असताना सरकारने त्यात एवढा मोठा आर्थिक हस्तक्षेप का केला आणि हा निधी नक्की कोणाला व कशासाठी दिला” असा धंगेकर यांचा सवाल आहे. “​राज्यात दुष्काळ, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व लग्नकार्यासारख्या गंभीर अडचणी असताना सरकारने अशा राजकारणावर कोट्यवधी रुपये खर्च करणे चुकीचे व लोकशाहीविरोधी आहे” असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

“भोंदू ‘खरात बाबा’ प्रकरणात रूपाली चाकणकर यांची विविध संस्था आणि ईडीमार्फत चौकशी झाली, मात्र 7-8 महिने उलटूनही तो चौकशी अहवाल अद्याप जनतेसमोर का आला नाही” धंगेकर यांचा प्रश्न. “उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच खरात बाबाच्या आश्रमाला कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी दिला आणि त्यांच्या पाया पडतानाचे फोटोही समोर आले” असा आरोप धंगेकर यांनी केला.

Loading...

चंद्रकांत पाटलांना सूट दिली जात आहे का?

“​रूपाली ताईंवर कारवाई होते, मग आपल्याच पक्षाचे नेते असल्यामुळे चंद्रकांत पाटलांना सूट दिली जात आहे का? या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा” अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. “पुण्यात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवर बोलताना, या कारवाईचे काही ठिकाणी स्वागत होत आहे तर काही नागरिक व व्यापारी नाराज आहेत” असं धंगेकर म्हणाले.

कोणावरही अन्याय होऊ नये

“​ही कारवाई पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच झाली पाहिजे; कोणावरही अन्याय होऊ नये आणि अधिकारी नियमबाह्य वागत असल्यास त्याची सखोल तपासणी व्हावी” अशी मागणी धंगेकर यांनी केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us