Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेताच वारं फिरलं, अब्दुल सत्तारांचे सूर बदलले, भाजपसाठी Good News

Eknath Shinde : "जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे, त्याबद्दल चर्चा झाली. युती म्हणून लढायचे ठरले आहे, त्यांची स्थानिक पातळीवर चर्चा होईल महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणार" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेताच वारं फिरलं, अब्दुल सत्तारांचे सूर बदलले, भाजपसाठी Good News
Eknath Shinde
| Updated on: Jun 03, 2026 | 7:57 AM

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. खासकरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी जास्त आहे. कारण विधान परिषदेच्या 17 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या चार जागा आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर 17 सदस्यांची निवड होणार आहे. छत्रपती संभाजीनगर एकवेळ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. पण आता तिथली जिल्हा परिषद आणि महानगर पालिका भाजपच्या ताब्यात आहे. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी छत्रपती संभाजीनगरची जागाही भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपंकडून समान वागणूक मिळत नाही अशी शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांची तक्रार आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे गेल्यानंतर मित्र पक्ष म्हणून शिवसेनेला मदत करणं भाग आहे. पण अब्दुल सत्तार यांच्या मुलाने विधान परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे पेच निर्माण झाला आहे.

त्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यातील महापौर निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरमधील पक्षाच्या आमदार, खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार सांदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संभाजीनगर मध्ये झालेल्या बंडखोरी आणि जिल्हा बँक निवडणुकीबद्दल चर्चा झाली. अब्दुल सत्तार महायुतीचा नियम पाळतील असे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेणार असं सत्तार यांनी सांगितलं.

फॉर्म मागे घेणार का?

“साहेब बोलतील ते अंतिम होते. तिकडून आदेश आला आहे, काही बोलायचे नाही, मी काय बोलू. आमचे नेते शिंदेसाहेब आहेत, ते जे बोलतील ते अंतिम राहील. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार, अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाने होईल. राज्यातील युतीला तडा जाणार नाही याची काळजी घेऊ. मिटिंग मध्ये एकनाथ शिंदेनी जो निर्णय दिला, त्याचं तंतोतंत पालन होईल” असं अब्दुल सत्तार म्हणाले. सर्व आमदार, खासदारांची तब्बल साडे तीन तास बैठक चालली. फॉर्म मागे घेण्यावर बोलले की, ‘मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार. त्यांच्याशी चर्चा करणार. मी उद्या बोलतो’

पूर्ण नंबर मेजॉरिटी महायुतीकडे आहे

“एकत्र बसतील त्याच्यावर तोडगा निघेल. महायुती आणि आम्ही 17 जागा लढवत आहोत. त्या जागा महायुती जिंकणार. पूर्ण नंबर मेजॉरिटी महायुतीकडे आहे. महायुतीचे नियम पाळायचे हे अब्दुल सत्तार यांना सांगितलं आहे. 4 तारखेपर्यंत सर्व नीट होणार” असं छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Follow Us