AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naresh Mhaske : रश्मी वहिनींना कोणी शिव्या घातल्या? सुप्रीम कोर्टाबाहेर काल जे घडलं, त्यानंतर नरेश म्हस्केंनी सगळ्याच आतल्या गोष्टी फोडल्या

Naresh Mhaske : "साहेबांसोबत आहे, तुम्हाला भेटायला येणार नाही. मला वर्षा बंगल्यावर बोलावलं त्यावेळी सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे साहेबांना बोलवा. अन्याय करु नका, जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करा"

Naresh Mhaske : रश्मी वहिनींना कोणी शिव्या घातल्या? सुप्रीम कोर्टाबाहेर काल जे घडलं, त्यानंतर नरेश म्हस्केंनी सगळ्याच आतल्या गोष्टी फोडल्या
Uddhav Thackeray-Rashmi Thackeray
| Updated on: Aug 12, 2026 | 12:07 PM
Share

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाबाहेर एक घटना घडली. संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांचा आमना-सामना झाला. त्यावेळी राऊतांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर म्हस्केंकडे पाहून ‘घेऊन ये त्याला’ असं म्हटलं. म्हस्के तिथून गेले. त्यानंतर राऊतांनी ‘अरे ये ना, यावच लागणार आहेना’ असं म्हटलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. “संजय राऊत फेकूचंद आहे. नरेश म्हस्के त्यांना प्रत्येकवेळी उत्तर देतो. त्यांच्याबद्दल भोंगा वैगेरे अशा शब्दांची निर्मिती केली आहे, त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो” असं नरेश म्हस्के म्हणाले.

“अख्ख्या शिवसेनेला माहित आह, ज्यादिवशी त्यांना राज्यसभेच तिकीट लवकर जाहीर होत नव्हतं, तेव्हा उद्धव ठाकरे सोडा, रश्मी वहिनींना किती शिव्या घातल्या होत्या हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. त्यांचं नाव जाहीर करायला उशीर झाला म्हणून ते हे सर्व बोलले” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. पण स्वत:च्या भावाला मंत्रिपद दिलं नाही. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, म्हणून शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये कोणी बैठक घ्यायला लावली? उद्धव ठाकरेंना विरोध करा मुख्यमंत्रीपदासाठी माझं नाव घ्या कोण सांगत होतं? हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे” असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला.

शिंदेसाहेबांसमक्ष मला सांगितलं होतं की..

“संजय राऊत एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हाप्रमुख हा नरेश म्हस्के आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी पाऊल उचललं , त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आलेला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, तुम्हाला भेटायला येणार नाही. मला वर्षा बंगल्यावर बोलावलं त्यावेळी सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे साहेबांना बोलवा. अन्याय करु नका, जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करा” असं नरेश म्हस्के म्हणाले. “राऊत अयोध्येचा दौरा होता. तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांसमक्ष मला सांगितलं होतं की, नरेश विधान परिषदेसाठी तुझं नाव आहे. तुम्ही अमशा पडवीला विधानपरिषदेचं तिकीट दिलं. तुम्ही शपथ घेऊन सांगा, उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेश म्हस्केला तिकीट दिलं तर तो एकनाथ शिंदेंसोबत जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाल्याच तुम्हीच राऊत मला सांगितलत” असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला.

एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो

“कसल्या गप्पा मारताय तुम्ही. जर तुम्ही खरचं बाळासाहेबांना मानत असाल, नरेश म्हस्केंच एकजरी पत्र तुमच्याकडे असेल तर दाखवा. एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो. सीनियर लीडर म्हणून तुमचा आदर ठेवतोय. बंद मूठ आहे, ती बंदच राहू द्या. शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही सतत फोन करत होता, काय बोलत होता? जाहीर करा तुम्ही. नरेश म्हस्केवर कितीही टीका करा, मी एकनाथ शिंदेंसोबत आहे, कायम राहणार” असं नरेश म्हस्के म्हणाले.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप