Ravindra Dhangekar : अरे बेट्या तुझे मालक लोक पण..कधी तुझी नसबंदी होईल हे तुला..रवींद्र धंगेकरांची नवनाथ बन यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून रवींद्र धंगेकर विरुद्ध नवनाथ बन असा सामना सुरु आहे. दिवसेंदिवस या शाब्दीक लढाईची पातळी घसरत चालली आहे. आज त़र कहरच झाला.

विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु झाला आहे. खासकरुन एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोपाची लढाई सुरु आहे. दिवसेंदिवस या शाब्दीक लढाईची पातळी घसरत चालली आहे. नवनाथ बन विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना असा हा सामना सुरु आहे. एकट्या नवनाथ बन यांच्यावर शिंदे सेनेचे तुटून पडले आहेत. आधी निलेश राणे यांनी नवनाथ बन यांची लायकी काढली. त्यानंतर आता पुणे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी त्यापेक्षा खालची पातळी गाठणारी पोस्ट केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. कार्टुन स्टाइलमधला हा फोटो आहे. मागे भाजपं कार्यालय आणि भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ आहे. एक नेता दारातच कु्त्र्याला पाव खाऊ घालतोय अशी ती पोस्ट आहे.
त्यावर “हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!! अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला. हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!!” असं कॅप्शन धंगेकर यांनी या फोटोला दिलय. #बनश्वान #चिल्ला_पुकार #Paid_Animal असे हॅश टॅगही दिले आहेत.
महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या बापाचा आहे का ?
त्याआधी आज सकाळी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांवर टीका केली. “देवेंद्रजींवर टिका करण्या आदी आत्मपरीक्षण करावे. बारा पक्ष फिरून आलेल्या माकड छापावर मी नाही पुष्कर तुळजापूरकर बोलतील” अशी रविंद्र धंगेकरांवर टिका केली. “मला ते डायनोसर म्हणतात, तो बलवान प्राणी आहे.रविंद्र धंगेकर याने फडणवीस यांच्यावर टिका करू नये ती त्यांची लायकी नाही. देवा भाऊकडे एक बोट दाखवत असाल तर तसेच उत्तर मिळेल. शिंदेसाहेबांकडे विनंती आहे तुमची लोकं अशी टिका करत असतील तर आम्ही तसेच उत्तर देऊ. धंगेकर म्हणतात महाराष्ट्रात फिरू देणार नाही, धमकी कोणाला देता, महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या बापाचा आहे का ? भविष्यात काय होईल हे नक्कीच सांगता येणार नाही” असं नवनाथ बन म्हणाले.