AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मराठ्यांना ओबीसी आरक्षण, मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीवर एकनाथ शिंदे म्हणाले की…

Eknath Shinde : पंतप्रधानांच्या आईबद्दल बोलणं, आरोप करण खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या संस्कृती विरोधात आहे. देशाला संस्कृती, परंपरा आहे, आपण सगळे आईला पूजनीय मानतो. हा देशवासियांच्या आईचा अपमान आहे" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : मराठ्यांना ओबीसी आरक्षण, मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीवर एकनाथ शिंदे म्हणाले की...
Manoj Jarange Patil eknath shinde
| Updated on: Sep 03, 2025 | 3:28 PM
Share

“हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जीआर काल सरकारने काढला. त्याबद्दल सविस्तर मी, मुख्यमंत्री बोललो. जो निर्णय घेतलाय तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलाय. नियमाला धरुन घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ करणं यावर तो निर्णय झालाय. जीआरमध्ये त्याचा उल्लेख आहे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “अंमलबजावणीत कुठलीही अडचण येणार नाही. कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील. ओबीसी समाजाचं कुठलही नुकसान होऊ नये, ही सरकारची आधीपासून भूमिका होती” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

छगन भुजबळांच्या नाराजीवर शिंदे म्हणाले की, “आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील, जो निर्णय घेतलाय त्याची वस्तूस्थिती समजावून सांगतिल. आम्ही घेतलेल्या निर्णयाची माहिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल” “हैदराबाद गॅजेटनुसार, 1967 आधीच कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे, त्या आधारावर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर ओबीसी प्रमाणपत्र मिळेल. निश्चित कायद्याच्या चौकटीत बसवून, नियम लक्षात घेऊन रुल 2012 अंतर्गत काल जीआर काढला” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘हा देशवासियांच्या आईचा अपमान’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल काल वक्तव्य केलं, आरोप केला हे दुर्भाग्यपूर्ण आहे. हे निंदाजनक आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करत आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी काम करतायत. त्यांना आईचा आशिर्वाद आहे. कधीही त्यांच्या आईचा राजकारणाशी संबंध नव्हता” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “पंतप्रधानांच्या आईबद्दल बोलणं, आरोप करण खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या संस्कृती विरोधात आहे. देशाला संस्कृती, परंपरा आहे, आपण सगळे आईला पूजनीय मानतो. हा देशवासियांच्या आईचा अपमान आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘आईचा अपमान बिहारी जनता सहन करणार नाही’

“आदरणीय पंतप्रधानांच्या आईबद्दल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांचा व्यवहार साधासुधा होता. हा देशातल्या सगळ्या आईंचा अपमान आहे. राहुल गांधी, काँग्रेस यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. मोदी जेव्हा देशासाठी काम करतात, तेव्हा राहुल गांधी, काँग्रेस त्यांची निंदा करतात. देशवासीय याचा बदला घेतील. आईचा अपमान बिहारी जनता सहन करणार नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.