AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी नाव न घेता निशाणा साधला.

'बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं', नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 9:00 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते त्यांच्या मुळगावी दरेगाव येथे बोलत होते. इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही, हे बरोबर आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली, गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेससोबत जायचं नाही हे काँग्रेससोबत गेले, असं हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोले केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिक्कामोर्तब केलं, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना स्विकारलं.  इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही हे बरोबर आहे, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस सोबत जायचं नाही हे काँग्रेस सोबत गेले, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  साहेबांचे नकली खोटे आवाज काढून कोणी लोक यांच्याकडे येणार नाहीत.  जर असली असाल तर तुम्हाला नकली आवाज काढण्याची गरज काय?  हा पोरकटपणा आहे, हा थिल्लार पणा आहे. बाळासाहेबांना वेदना देण्याचं, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं हे काम आहे. साहेब असते तर त्यांनी त्यांना चाबकाने फटकारलं असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

गावाकडे आलो की वृक्ष लागवडीचा माझा कार्यक्रम असतो. गावकऱ्यांना माझं आव्हान आहे शेती भाती वरती अवलंबून न राहता फळझाडे लावली पाहिजेत. एकत्रित येऊन समूह शेती केली तर लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. नागरिकांनी निसर्गाला सांभाळलं पाहिजे निसर्गाचे रक्षण केलं पाहिजे. ती संकल्पनाच आहे, नवीन महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?