
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीने अनेक लोकप्रिय घोषणांची बरसात केलेली आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होत असल्याने या निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकात महायुतीला फटका बसल्याने महायुतीने लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना आणल्या आहेत. महायुतीतील तिन्ही गट भाजपा, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या योजनेचे श्रेय घेऊन प्रचाराला लागले आहेत. तर मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने या योजनांवर टीका करीत मतांसाठी ही योजना असल्याचे म्हटले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण कोणाचे ? महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी एकट्या मुंबईत 36 आणि ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदार संघ आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबई, ठाणे आणि कल्याण तसेच कोकणातील जास्तीत जास्त जागा लढविण्यासाठी तयार आहेत. परंतू महायुती आणि महाविकास आघाडीत शिंदे...