मोठी बातमी! एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ज्या नेत्याचं भाकीत खोटं ठरत नाही, त्याचीच मोठी भविष्यवाणी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, एकनाथ शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं वर्तवल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ज्या नेत्याचं भाकीत खोटं ठरत नाही, त्याचीच मोठी भविष्यवाणी
एकनाथ शिंदे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 13, 2025 | 6:04 PM

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात सर्वात जास्त पक्षप्रवेश झाल्याचे पहायला मिळाले, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, त्यामुळे अनेकदा यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता.  या बहिष्काराची राज्यात जोरदार चर्चा झाली, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं, आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. शिंदे पुढील एक ते दोन महिन्यात मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले? 

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पावर काय आहे हे दाखवून दिलं आहे,  येणाऱ्या राज्यातल्या महापालिका आम्ही वेगळे लढणार अस भाजपा सांगत होती, पण आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. युती करून लढू असं ते आता म्हणत आहेत.  एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहेत. विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही,  त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसत आहे,  एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटत आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, शरद पवार हे चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती, यातून एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला आहे. मला तरी यातून हेच दिसत आहे, अमित शाह यांच्या सारख्या माणसाला शिंदे यांनी शिखात घातलं आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us