तोच आसूड उद्धव ठाकरेंनी स्वत:ला मारून घ्यावा, एकनाथ शिंदे यांचा पलटवार; असं का म्हणाले?

शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर पालिकांच्या निवडणूकांसाठी मतदार संघ आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. चेंबूर येथे घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

तोच आसूड उद्धव ठाकरेंनी स्वत:ला मारून घ्यावा, एकनाथ शिंदे यांचा पलटवार; असं का म्हणाले?
eknath shinde and Uddahv Thackeray
| Updated on: Oct 11, 2025 | 10:29 PM

आगामी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठका सुरु केल्या आहेत. चेंबुर येथील अशा बैठकीला संबोधन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे निवडणूकीसाठी कोणालाही सोबत घेतली. उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.

मी मुख्यमंत्री असताना सुद्धा उद्धव ठाकरे टीका करत होते. मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते. निवडणूक आयोगाला शिव्या देत होते. आता आपण त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत. आपल्याला केवळ एकच ब्रँड माहिती आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे हा होय असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेंबूर येथील आढावा बैठकीत ठणकावून सांगितले.

आम्ही आमच्या कामातून विरोधकांना उत्तर देणार आहेत.आणि या केलेल्या कामाच्या जोरावर महायुती जिंकणार आहे. त्यांनी हबंरडा मोर्चा काढला आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर केलेले आहे. ते त्यांना माहिती नाही. हबंरडा फोडताना डोळ्यात आसू असतात, चेहऱ्यावर रडू असते. परंतू ते तर हसत होते. आणि हातात आसूड होता अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

आपण गेल्यावेळी उत्तर पश्चिमचा आढावा घेतला होता. आज दक्षिण मध्य मुबईचा आढावा घेतोय. येथे ६ विधानसभा येतात. येथे आता वॉर्डनुसार बैठका होतील पदाधिकारी नेमणूका, मतदार याद्या याचा आढावा घेतला जाईल, निवडणूका शिवसेनेला नवीन नाहीत. मी मुख्यमंत्री असताना आम्ही मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीटीकरण केले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले, आपला दवाखाना सुरू केला असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की मुंबई हे जागतिक शहर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आले होते. काही करार ही केले. मुंबईचं महत्व मोठं आहे. आम्ही केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेला मिळाली आणि आता पालिका निवडणूकीतही ती मिळेल. पद एक उमेदवार हा नियम आम्ही लावणार आहे. निवडणूकीत पद देत असताना काही महामंडळ, जिल्हा कमिठ्या इथे कार्यकर्त्यांना संधी नक्की मिळल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आश्वस्थ केले.

उद्धव ठाकरे सत्तेसाठी उद्या काहीही करतील !

उद्धव ठाकरे सत्तेसाठी उद्या MIM काय तर पाकिस्तानलाही सोबत घेतील. निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. मुंबईत इतके घोटाळे ठाकरेंनी केले आहेत की त्यांनी स्वत:वर आसूड मारून घ्यायला हवेत. त्यांनी मुंबईत केलेल्या चुकांसाठी स्वत:लाच आसुड मारुन घ्यायला हवा अशी जोरदार टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.