AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उडी, ऑपरेशन टायगरवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट म्हणाले, बॉडीही…

राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारने विरोधकांच्या चहापानाच्या बहिष्कारावर मिश्कील भाषेत टीका केली. विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडल्यास त्यांना सहकार्य केले जाईल. मात्र, राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उडी, ऑपरेशन टायगरवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट म्हणाले, बॉडीही...
devendra fadnavis
| Updated on: Jun 21, 2026 | 10:09 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. या प्रसंगी राज्यातील विरोधकांनी जर जनतेच्या कामाचे प्रश्न मांडले तर त्यांना योग्य सहकार्य केले जाईल, परंतू जर त्यांनी राजकारण करण्याचे ठरवले तर त्यांनी त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे सांगितल्याने येणारे पावसाळी अधिवेशन वादळी होणार याचे संकेत मिळाले आहेत. विरोधकांनी चहापानाच्या बहिष्कार करणारे पत्र दिले आहे. ते एआयचा वापर करुन तयार केल्याचा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरवर प्रथमच वक्तव्य केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली. त्यांनतर पत्रकारांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा. लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही अशा शब्दात पत्रकारांनी उत्तर दिले. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या वडीलांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल होता. त्यामुळे अशा संवेदनशील परिस्थितीत त्यांना शिवीगाळ करणे योग्य नव्हते. त्यांच्याकडे होते तेव्हा तळागाळाचा नेता म्हणायचे आता रिल्स स्टार म्हणत आहेत. सकाळी शिवीगाळ करतात आणि रात्री घरी जाऊन पाय धरतात, म्हणजे नक्कीच काहीतरी केमिकल लोचा आहे अशा मिश्कील शब्दात शिंदे यांनी यावेळी उबाठावर टीका केली.

ऑपरेशन एकदम यशस्वी, बॉडी सुखरुप…

उबाठाच्या या सहा खासदारांना फोडण्याच्या ऑपरेशन टायगर बद्दल इतके दिवस अवाक्षरही न काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मध्येच थांबत हे ऑपरेशन एकदम यशस्वी झाले आहे आणि बॉडी सुखरुप आहे अशी टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात टीका केली असल्याचा प्रश्न करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी काल एक मिम्म पाहिले. राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत. त्यावर लिहिलंय, मला शांत झोप लागते. कारण माझ्याकडे खासदार नाही, आमदार नाही. त्यामुळे कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. यावेळी एकच खसखस पिकली.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!