आधी Election सोसायट्यांचे; नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या बाजार समित्यांवर आता प्रशासक नेमणार की आहे त्याच संचालक मंडळाला अजून मुदतवाढ देणार, अशी चर्चा रंगली आहे.

आधी Election सोसायट्यांचे; नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द
कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 1:19 PM

नाशिकः न्यायालयाने आधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रद्द केला आहे. विभागाने प्रारूप मतदार यादी जाहीर करणे आणि त्यावर हरकती मागणविणेही पुढे ढकलले आहे.

का घेतला निर्णय?

बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गट आहे. कोरोनामुळे सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे या गटातील सदस्यांना बाजार समिती निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागले असते. असा मुद्दा न्यायालयात दाखल याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर वकिलांनी प्रतिवादही केला. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीआधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे पाहता जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समिती आदींची निवडणूक तूर्तास तरी पुढे ढकलली आहे.

कोरोनामुळे पूर्वीच मुदतवाढ

कोरोनाच्या भयंकर लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीला यापूर्वी दोनवेळेस मुदतवाढ देण्यात आली. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. मात्र, जिल्ह्यात त्यानंतरही निफाड आणि सिन्नर ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत होती. निवडणूक म्हटला की प्रचार आला. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज संचालकांनी जिल्हा उपनिबंध कार्यालायला दिला होता. हा अर्ज कार्यालयाने पुढे पणन मंडळाकडे पाठवला. त्यानंतर सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

आता प्रशासक की मुदतवाढ?

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या बाजार समित्यांवर आता प्रशासक नेमणार की आहे त्याच संचालक मंडळाला अजून मुदतवाढ देणार, अशी चर्चा रंगली आहे. ही मुदतवाढ किती महिन्यांची असणार, याचीही उत्सुकता लागली आहे. एकीकडे नाशिक महापालिका निवडणूक आणि दुसरीकडे बाजार समित्यांची निवडणूक. यापैकी आता कोणती निवडणूक अगोदर होणार, हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

Nashik| ग्रीनफिल्ड महामार्ग वादाच्या भोवऱ्यात, 4 गावांचा विरोध, बागायती जमिनी जिरायती दाखवल्याचा आरोप

वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले

Nashik| 100 कोटींचा TDR Scam; महाालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत, ऐन निवडणुकीत धुरळा!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.