AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट, रेल्वेसेवा विस्कळीत

पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट, रेल्वेसेवा विस्कळीत
Train accident
| Updated on: Jun 20, 2025 | 8:19 PM
Share

पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पालघर वांद्र एक्सप्रेस ट्रेनवर ही वायर कोसळली त्यामुळे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अचानक मोठा स्फोट

पालघरमध्ये झालेल्या या घटनेमुळे अप आणि डाउन मार्गावरील सेवा प्रभावित झाली आहे. या घटनेबाबत ट्रेनमधील एका प्रवासी महिलेने सांगितले की, ‘रेल्वे कमी वेगाने धावत होता. अचानक मला काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी खाली उतरुन पाहिले तर ट्रेनच्या खाली उतरले होते आणि व्हिडिओ बनवत होते.’

प्रवासी घाबरले 

पुढे बोलताना या महिलेने म्हटले की, वायर तुटलेल्या ठिकाणी ठिणग्या उडत होत्या, त्यामुळे लोक घाबरलेले होते. रेल्वे प्रशासन प्रवाशांना आतमध्ये बसण्याची विनंती करत होते, मात्र लोक खाली उतरलेले होते.

दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, प्रवास असुरक्षित वाटत आहे. घराच्या बाहेर पडावं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही पावसात उभे राहिलो आहोत, आम्हाला ट्रेनमध्ये जाण्याची भीती वाटत आहे. तसेच अनेक प्रवाशांनी स्फोटानंतर गाडीतून खाली उडी मारल्याचीही माहिती समोर आली आहे.

प्रवाशांचे हाल

दरम्यान, पश्चिम रेलवेच्या पालघर रेलवे स्थानकवर ओवर हेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी सर्व लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पालघरच्या दिशेने जाणाऱ्या दोन लोकल आणि एक लांब पल्याची ट्रेन विरार स्थानकात थांबली आहे. कामावरून घरी जाण्याच्या वेळेस ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

बांद्रा येथून निघालेली बांद्रा अजमेर एक्सप्रेस पालघर येथे थांबली होती आणि पालघर रेल्वे येथून जात असताना प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून एक नंबर वर क्रॉसिंग करत असताना अचानक ट्रेनवर ओहर हेड वायर पडली आणि मोठा स्फोट झाल्याने प्रवासी यांची तारांबळ उडाली, ह्या दरम्यान एका महिला प्रवाशाने आपल्या जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनवरून उडी मारली, सुदैवाने कुठली ही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दुरुस्तीचे काम सुरु

सध्या एक तासांपासून रेल्वे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करत आहेत. जो पर्यंत बांद्रा अजमेर ट्रेनला पुढे घेऊन जाणारे डिजल इंजन येत नाही तो पर्यंत दोन्ही लाइन अप आणि डाऊन पूर्ण बंद राहणर आहेत. या घटनेमुळे,गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व एक्सप्रेस आणि लोकल वाहतूक पूर्णपने विस्कळीत झाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.