मोठी बातमी! मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न  केला आहे. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव आहेत,

मोठी बातमी! मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 8:46 PM

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न  केला आहे. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव आहेत, या घटनेनं खळबळ उडाली आहे. त्या खोलीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आल्या आहेत. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिल्याची माहिती समोर येत आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत.

हेमलता ठाकरे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव आहेत. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. त्या एका खोलीमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या, त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांना शिपाई मिळत नाही म्हणून, त्यांनी तक्रार दिली होती. परंतु त्यांनी आता आपल्याला वरिष्ठांकडून त्रास होतोय, कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळत नाही असं सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांनी आपला छळ केल्याचा आरोप देखील हेमलता ठाकरे यांनी या सुसाईड नोटमध्ये केला आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान त्या एका खोलीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आल्या, त्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेमलता ठाकरे यांनी सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंवर आणि कुलसचिवांवर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.