AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले, तरी आपल्या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी हे एकत्र येतील. भाजपला पराभूत करण्यासाठी हे एकत्र येतील.

VIDEO | राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 21, 2022 | 4:50 PM
Share

नाशिकः महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, हे यांना माहीत नाही, अशी जोरदार टोलेबाजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ते नाशिकमध्ये (Nashik) बोलत होते. महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपच्या विविध विकासकामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून महापालिकेचा दोन-अडीच वर्षांचा काळ मिळाला. मेट्रो सुरू करावी, ही नाशिककरांची इच्छा होती. नाशिकचा नियो प्रकल्प पथदर्शी ठरला. आता हेच नियो मेट्रोचे नाशिक मॉडेल देशभरात लागू होणार आहे. हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी आहे. केंद्राची मंजुरी मिळाली आणि राज्य सरकारने चालत्या सायकलमध्ये स्पोक घातला नाही, तर 3 वर्षांत नियो मेट्रो सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्य दलाली खाण्यासाठी नसतं…

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महाालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, शहर दत्तक घेतले म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असं नाही. शहरात एवढी कामे झाली आहेत, त्याच कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांची काम करण्यासाठी हवं असतं, असा टोला त्यांनी विरोधकांचा नाव न घेता हाणला. तसेच प्रदूषणमुक्त निर्मला गोदावरीसाठी नमामी प्रोजेक्ट केंद्र मंजूर करेल, असा आशावाद व्यक्त केला.

नाशिकवर अन्याय केला

फडणवीस म्हणाले की, कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली. राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं. हे जर जाऊन बसले नसते, तर नाशिकला ऑक्सिजन मिळालं नसतं. महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य मुंबईच्या बाहेर देखील असतं, हे यांना माहीत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

राजकारणात केमिस्ट्री चालते

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले, तरी आपल्या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी हे एकत्र येतील. भाजपला पराभूत करण्यासाठी हे एकत्र येतील. राजकारणात 1 आणि 1 = 2 होत नाही. राजकारणात अर्थमॅटिक नाही तर केमिस्ट्री चालते. आपल्याकडे जागांची अपेक्षा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपचे तिकीट मिळणे म्हणजे विजयाची खात्री आहे. तिकीट वाटपात नेत्यांनी नातेवाईकांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा विचार करायचा आहे. कार्यकर्त्यांनी पार्टीचा विचार करायचा. आमचा उमेदवार म्हणजे कमळाचे चिन्ह ही मानसिकता घेऊन उतरावं लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?