AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare photo with Ashok Kharat : दीपक केसरकरांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही लावली भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात हजेरी; तो फोटो व्हायरल

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला महिलांवरील लैंगिक शोषण आणि छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रेही जप्त झाली आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Sunil Tatkare photo with Ashok Kharat : दीपक केसरकरांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही लावली भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात हजेरी; तो फोटो व्हायरल
सुनिल तटकरे
| Updated on: Mar 20, 2026 | 1:40 PM
Share

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात हा महिलांवरील अत्याचारामुळे चर्चेत आला असून बलात्काराच्या गंभीर आरोपाखील त्याला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नरमधल्या अशोक खरात याला लैंगिक शोषण आणि छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रे, काडतुसे जप्त करण्यात आली असून अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटींशी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली टाकणकर यांचे तर खरात यांच्याशी जवळचे संबंध , त्या त्यांच्या शिष्या आहेत. त्यांनी त्यांचे पाद्यपूजन करताना, त्यांच्या डोक्यावर छत्री धरतानाचे असे अनेक फोटो, तसचे व्हिडीओ यापूर्वी समोर आले होते.

पण एवढंच नव्हे तर इतरही अनेक राजकारणी नेत्यांचे खरात यांच्याशी संबंध असून एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यासोबतचे फोटोही उघड झाले. मात्र याच प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचेही अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आलेत.

खरात यांच्या मुलाच्या लग्नात तटकरे हजर

सुनील तटकरे यांनी खरात यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली होती, त्यावेळचे त्यांचे काही फोटो समोर आले असून तटकरे यांची त्या वेळची पोस्टही व्हायरल झाली आहे. त्या लग्नात तटकरे यांच्यासोबत दीपक केसरकर हेही उपस्थित असल्याचे दिसून आले. ” आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे चि. शुभम आणि चि. सौ. कां. त्रिप्तबाला यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून, नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंदी सहजीवनासाठी शुभाशीर्वाद दिले.” अशी पोस्ट लिहीत तटकरे यांनी लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. एका फोटोत त्यांच्या शेजारी भोंदू बाबा अशोक खरात हे बसलेले दिसत आहेत. हेच फोटो आता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहेत.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले